रविवार, सप्टेंबर 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“प्रतिष्ठा, आदर गमावला अन्…”, नावाजलेल्या विमान कंपनीवर भडकला जितेंद्र जोशी, म्हणाला, “प्रवाशांची माफी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 2, 2023 | 6:43 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
jitendra joshi flight delay

“प्रतिष्ठा, आदर गमावला अन्...”, नावाजलेल्या विमान कंपनीवर भडकला जितेंद्र जोशी, म्हणाला, “प्रवाशांची माफी...”

सार्वजनिक वाहनांचा वापर करताना किंवा विमानप्रवास करताना अनेकांना विविध अनुभव येतात. काहींचा प्रवास सुखकर होतो. तर काहींना यादरम्यान बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. सेलिब्रिटी मंडळींनाही हे काही चुकलं नाही. बऱ्याचदा विमानप्रवास करत असताना कलाकारांना विविध प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. कधी फ्लाइट वेळेवर नसल्यामुळे गोंधळ उडतो तर कधी सामानही उशीराने मिळतं. असंच काहीसं अभिनेता जितेंद्र जोशीबाबत घडलं आहे. कामानिमित्त विमान प्रवास करत असताना त्याला आलेला अनुभव जितेंद्रने सगळ्यांबरोबर शेअर केला आहे.

जितेंद्रला विमान प्रवासादरम्यान आलेल्या अनुभवाबाबत त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे संतप्त पोस्ट शेअर केली आहे. त्याची फ्लाइट उशीराने आली. त्यामुळे जितेंद्रचा राग अनावर झाला. अशामध्ये त्याने विमानत बसलेला एक फोटो शेअर केला. तसेच त्या संबंधित विमान कंपनीला टॅगही केलं. फ्लाइट उशीरा येऊनही कंपनीने प्रवाशांची माफी मागितली नसल्याची तक्रारही जितेंद्रने केली.

आणखी वाचा – घटस्फोटादरम्यान करवा चौथ केल्याबाबत नको नको ते बोलले, पण मानसी नाईकने अखेर दिलं स्पष्टीकरण, म्हणाली, “नव्या नवरीला…”

जितेंद्र म्हणाला, “खूप वाईट. तुम्ही तुमची प्रतिष्ठा आणि आदर गमावला आहे. ९० मिनिटांपेक्षा अधिक वेळ तुमची विमानं उशीराने उड्डाण करत आहेत. तुम्ही याबाबत प्रवाशांची साधी माफीही मागितली नाही”. नावाजलेल्या विमान कंपनीला त्याने टॅगही केलं आहे. इंडिगो विमान कंपनीबाबत जितेंद्रला हा अनुभव आला आहे. जितेंद्रच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

आणखी वाचा – Video : हात पकडून स्टेजवर आणलं, मिठी मारली अन्…; शाहरुख खानने मराळमोळ्या मुक्ता बर्वेला दिलेली वागणूक पाहून रंगली तुफान चर्चा

जितेंद्रबरोबरच याआधी अनेक कलाकार मंडळींना या परिस्थितीचा सामना करावा लागला होता. काही कलाकारांना तर विमानतळावर उतरल्यानंतर त्यांचं सामानही मिळालं नाही. अशा बऱ्याच तक्रारी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांपर्यंत पोहोचवल्या. आता जितेंद्रच्या या पोस्टनंतर इंडिगो विमान कंपनी प्रवाशांची माफी मागणार का? हे पाहावं लागेल.

Tags: entertainment newsmarathi actormarathi movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Ganesh Vandana
Entertainment

बाप्पाच्या भक्तीत रंगणार ‘आली मोठी शहाणी’ मधील ‘गणेश वंदना’,

सप्टेंबर 12, 2026 | 10:16 am
Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Next Post
Ajinkya deo share a comedy video during traveling

Video : एका दुचाकीवर चार माणसं, अजिंक्य देव यांनी व्हिडीओ शेअर करत दाखवली 'ती' सत्य परिस्थिती, म्हणाले, “गाडी ठोकणार पण…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.