सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : एका दुचाकीवर चार माणसं, अजिंक्य देव यांनी व्हिडीओ शेअर करत दाखवली ‘ती’ सत्य परिस्थिती, म्हणाले, “गाडी ठोकणार पण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 2, 2023 | 6:49 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ajinkya deo share a comedy video during traveling

Ajinkya deo share a comedy video during traveling

मराठीतील एक प्रगल्भ अभिनेते म्हणून अजिंक्य देव यांची ओळख आहे. त्यांनी आपल्या अभिनयातून सगळ्यांच्या मनात आपलं वेगळं स्थान मिळवलं. त्यांच्या अभिनयासह त्यांचं देखणं व्यक्तिमत्त्व सगळ्यांनाच भावतं. त्यांनी आजवर बऱ्याच चित्रपटात काम केली आहे. मराठीच नाही तर बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत काम केलं आहे. अजिंक्य सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. कामासह इतर व्हिडीओ ते इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसतात. आताही त्यांनी प्रवास करतानाचा रस्त्यावर पाहिलेला मजेशीर प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Ajinkya deo share a comedy video during traveling)

अजिंक्य यांनी शेअर केलेल्या व्हिडीओ हा चारचाकी गाडीतून चित्रीत केला दिसत आहे. त्यात एका दोन चाकी गाडीवर ड्रायव्हरसह चार जण बसलेले आहेत. ते ज्या प्रकारे बसले आहेत ते खरंच खूप हास्यास्पद आहे. पुढे बसलेला ड्रायव्हर अगदी टोकावर बसला असून मध्ये दोन वयस्कर व्यक्ती बसले आहेत. तर सगळ्यात मागे एक तरुण बसला आहे जो स्वतःचे पाय मागे उलटे दुमडून विचित्र प्रकारे बसलेला दिसत आहेत. या व्हिडीओला अजिंक्य कॅप्शन देतात, ‘ही मैत्री आम्ही कधीच नाही तोडणार, गाडी ठोकणार पण साथ कधी नाही सोडणार’, असं लिहीत त्यांनी विनोदी अंदाजात हा प्रकार सोशल मीडियावर मांडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajinkya R Deo (@ajinkkyadeo)

आणखी वाचा – मानेवर मांस ठेवल्यानंतर वाघाने उडी मारली अन्…; एका सीनसाठी जीव धोक्यात ठेऊन काम करत होता बॉबी देओल, स्वतः केला खुलासा, म्हणाला, “त्याक्षणी वाघ…”

या व्हिडीओतून त्यांना आपण वाहतुकीचे नियम किती छान प्रकारे पाळतो हे विनोदी स्वरूपात सांगितलं आहे. बऱ्याचदा कलाकार प्रवास करत असताना त्यांना प्रवासात दिसलेल्या ‘नावाच्या प्लेट्स’ शेअर करताना दिसतात. त्यांच्या या मागचा उद्देश वाहतुकीचे नियम पाळणं आणि आपल्या समाजात याविषयीची सतर्कता निर्माण करण्याच्या अनुषंगाने असतात. तसंच आज अजिंक्य यांनी शेअर केलेला व्हिडीओ हा त्याच लोकांसाठी आहे जे लोक अशाच प्रकारे प्रवास करतात. एक गाडीवर २ माणसं असणं अपेक्षित आहे पण या व्हिडीओत तर तब्बल चार माणसांनी प्रवास केला जात आहे.

आणखी वाचा – Shah Rukh Khan Birthday : मध्यरात्री मन्नतबाहेर हजारो चाहत्यांची गर्दी, ‘ते’ दृश्य पाहून शाहरुख खानलाही यावं लागलं बाहेर, म्हणाला, “रात्री उशिरापर्यंत…”

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. नेटकरीही या व्हिडीओवर लाईक व कमेंट करताना दिसत आहे. बऱ्याच नेटकऱ्यांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत तर एका नेटकऱ्याने, ‘फार मजा मजा येतेय अशा रोड राईडची’, असं लिहीत मजेशीर अंदाजात कमेंट केली आहे.

Tags: ajinkya deoComedy Videomarathi actor
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Nita Ambani makeup room photo leaked

Video : महागड्या साड्या, किंमती वस्तू अन्…; असं आहे नीता अंबानींचं घरातील मेकअप रूम, Inside व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.