गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

lakshmi niwas promo : जान्हवी होणार आई, प्रेग्नन्सी न्यूज ऐकताच जयंतच्या चेहऱ्याचा रंगच उडाला, येणाऱ्या बाळाचा स्वीकार करणार का?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 11, 2025 | 12:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
lakshmi niwas promo

lakshmi niwas promo : जान्हवी होणार आई, प्रेग्नन्सी न्यूज ऐकताच जयंतच्या चेहऱ्याचा रंगच उडाला, येणाऱ्या बाळाचा स्वीकार करणार का?

lakshmi niwas promo : ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. ही मालिका गेल्या काही दिवसांपासून टीआरपीच्या शर्यतीतही असलेली पाहायला मिळाली. ही मालिका एका आशयघन नात्यांच्या गुंतागुंत असलेल्या विषयाने चर्चेत आहे. कलाकारांची फौज असलेली ही मालिका नेहमीच कथेत ट्विस्ट घेऊन रसिकांच्या भेटीस येताना दिसते. दरम्यान, मध्यंतरीच्या काळात एका पात्रामुळे मालिका ट्रोलही झालेली पाहायला मिळाली. मालिकेला ट्रोलिंगचा सामना करावा लागला तो म्हणजे जयंत या पात्रामुळे. मालिकेत जयंत हे पात्र काहीसं विचित्र दाखविण्यात आलं आहे त्यामुळे अनेकांच्या डोक्यात हे पात्र गेलं आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

कथेत जयंत हे पात्र अगदी विचित्र स्वभावाचं दाखविण्यात आलं. आपल्या पत्नीचे केवळ आपल्यावरच प्रेम राहावे वा तिचे त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणीही कौतुकही करु नये असं जयंतला वाटत असतं. जयंतचा वाईट विचार नेहमीच जान्हवीला शिक्षा देताना दिसला. बरेचदा जयंतने जान्हवीवर संशयही घेतला. प्रेम सिद्ध करण्यासाठी त्याने जान्हवीला झुरळही खाण्यास सांगितलं. जान्हवीलाही कालांतराने जयंतचा विचित्र स्वभाव कळू लागला. यांत त्याचा स्वभाव नेमका असा का झाला आहे यामागे काय गुपित आहे?, त्याचा भूतकाळ काय याचा शोधही जान्हवी घेताना दिसली.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजीची रिप्लेसमेंट होणार?, ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीच्या नावाची चर्चा, फोटोही समोर

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

दुसरीकडे, जान्हवी जयंतला वठणीवर आणण्यासाठी एक गुडन्यूज देते. जान्हवी गरोदर असल्याचं जयंतला सांगते, हे ऐकून जयंत खुश न होता त्याला धडकी भरते आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. जयंतला ही गुडन्यूज देण्यासाठी ती एक सरप्राईज प्लॅन करते. केक, फुलांची सजावट करत जयंत ही आनंदाची बातमी नवऱ्याला देते. बाळाच्या येण्याने जयंतचा स्वभाव बदलेल असं तिला वाटत असतं. पण ही बातमी ऐकून जयंतला मोठा धक्का बसतो.

आणखी वाचा – “त्यांचं नातं विषारी होतं”, कुमार सानूबरोबरच्या अफेअरबाबत अभिनेत्रीच्या मुलाचा खुलासा, म्हणाला, “माझ्या आईचे बॉयफ्रेंड…”

तर येत्या काही दिवसांत जान्हवीकडे तिची आई आणि आजी राहायला येणार असतात. लक्ष्मी आणि शांता आजीच्या येण्याने जान्हवीचा थोडातरी त्रास कमी होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. जयंतच्या जाचातून जान्हवीची सुटका होणार आहे. पण या दोघींचं येणं जयंतला खटकणार का?, याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. याशिवाय जान्हवी प्रेग्नेंट आहे ही गोष्ट त्याला पटणार का?, तो बाळाचे स्वागत करणार का हे पाहणंही मालिकेत रंजक ठरेल.

Tags: lakshmi niwaslakshmi niwas promomarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Next Post
Ashvini Mahangade Instagram

गावाकडे रमलीय अश्विनी महांगडे, चुलीवर भाकऱ्या थापतानाही दिसली आणि…; साधेपणाचं होतंय कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.