मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गावाकडे रमलीय अश्विनी महांगडे, चुलीवर भाकऱ्या थापतानाही दिसली आणि…; साधेपणाचं होतंय कौतुक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 11, 2025 | 4:46 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ashvini Mahangade Instagram

गावाकडे रमलीय अश्विनी महांगडे, चुलीवर भाकऱ्या थापतानाही दिसली आणि…; साधेपणाचं होतंय कौतुक

Ashvini Mahangade Instagram : बरेचदा कलाकार मंडळींचा साधेपणा प्रेक्षकांना विशेष भावतो. बरीच अशी कलाकार मंडळी आहेत ज्यांचे आजवर त्यांच्या साधेपणामुळे कौतुक झाले आहे. बरेच असे कलाकार आहेत जे गावाकडे जाऊन शेती करतात. गावच्या लोकांसह गावच्या वातावरणात रमतात. बरेचसे कलाकार हे मुंबईतील नसून पुणे, साताराकडचे आहेत. त्यामुळे त्यांची घर ही गावाकडे आहेत. त्यामुळे शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत ही मंडळी घराकडे गावी जाताना दिसतात. गावी जात ते गावच्या वातावरणात मिसळून अनेकदा काम करताना दिसतात. अशातच अभिनेत्री अश्विनी महांगडे हिनेदेखील गावाकडे जात गावच्या घराची झलक शेअर केली आहे.

अभिनेत्री अश्विनी महांगडे यापूर्वी अनेकदा तिच्या वाई येथील घरी जाताना दिसते. इतकंच नव्हेतर ती त्यांच्या शेतात शेती करतानाही दिसली आहे. आताही अश्विनी तिच्या घरी गेली आहे. आणि घराच्या मागच्या खोलीतील एक सुंदर आठवण तिने शेअर केली आहे. यामध्ये ती चुलीवर स्वतःच्या हाताने जेवण बनवताना दिसत आहे. ती भाकऱ्या थापताना दिसत असून ती तिच्या दोन्ही भावंडांना खाऊ घालताना दिसत आहे.

आणखी वाचा – lakshmi niwas promo : जान्हवी होणार आई, प्रेग्नन्सी न्यूज ऐकताच जयंतच्या चेहऱ्याचा रंगच उडाला, येणाऱ्या बाळाचा स्वीकार करणार का?

View this post on Instagram

A post shared by Asʜvɪɴɪ Pʀᴀᴅɪᴘᴋᴜᴍᴀʀ Mᴀʜᴀɴɢᴀᴅᴇ (@ashvinimahangade)

ही आठवण शेअर करत तिने कॅप्शन देत म्हटलं, “नानांनी खूप प्रेमाने बंगला बांधला आणि सगळ्यात मागे एक खोली काढली ती चुलीसाठी. बऱ्याचदा आम्ही जेवायला इथेच बसतो. पण मला वाटते आमच्या यात्रेला या खोलीचा सगळ्यात जास्त उपयोग होतो. हा फोटो मला फार आवडला कारण घरात मी मोठी असल्या कारणाने मी भाकरी करत आहे आणि माझी दोन्हीही लहान भावंडं म्हणजे जिजा आमच्या वकिलीनबाई व बद्रीशेट उद्योजक जेवणाचा आनंद घेत आहेत. त्यांच्याबरोबर आमचा राया”.

आणखी वाचा – कॅन्सर ट्रीटमेंटदरम्यान दीपिका कक्करच्या रक्त तपासणीचे रिपोर्ट समोर, पाहताच अभिनेत्रीच्या डोळ्यांत पाणी, नवऱ्याने सांत्वन केलं आणि…

पुढे ती म्हणाली, “‘स्वराज्य’ आमच्या घराचे नाव देताना नानांनी त्यांची जबाबदारी पार पाडली आणि ते स्वराज्य वाढवण्याची, टिकवण्याची जबाबदारी आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत”. अश्विनीचा हा फोटो पाहून अनेकांनी तिच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे.

Tags: ashvini mahangadeAshvini Mahangade homemarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
paaru serial Promo

Paaru Serial Promo : अखेर अहिल्यासमोर आलं आदित्य-पारूच्या प्रेमाचं महासत्य, दोघांनाही घराबाहेर काढलं आणि…; मोठा ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.