rakhi sawant latest video : राखी सावंतचे काही लेटेस्ट व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यामध्ये ती एका अवॉर्ड शोच्या स्टेजवर बार्बीप्रमाणे स्वत:ला फ्लाँट करताना दिसत आहे. 48 वर्षीय राखी सावंतला असे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. राखी ही इंडस्ट्रीतील अशा कलाकारांपैकी एक आहे जी फक्त मस्तच बोलत नाही तर मस्त स्टाइल देखील दाखवते. यावेळी राखीची स्टाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून ती आता इंटरनेटवर चर्चेत आहे. राखी सावंत एका व्हिडीओमध्ये स्टेजवर स्वत:ला फ्लाँट करताना आणि खळबळ माजवताना दिसत आहे. ती पापाराझी कॅमेऱ्यांसाठी जबरदस्त पोज देत आहे आणि तिच्या या लूकने तिने सर्वांची मने जिंकली आहेत. मात्र, राखीचा हा लूक पाहून अनेकांनी मान हलवली आहे.
दुसऱ्या व्हिडीओमध्ये तिचे केस गळताना दिसत आहेत. जेव्हा लांबलचक केस खाली पडू लागतात तेव्हा राखीसमोर उपस्थित असलेले लोक त्यांच्याकडे पाहतात आणि म्हणतात, “केसगळती इतकी मोठी नाही”. यानंतर राखीने ते केस प्रेक्षकांच्या दिशेने फेकले. लोकांनीही या व्हिडीओवर आपले मत व्यक्त केले आहे. नुकतेच राखी सावंतने भारती सिंगच्या शोमध्ये सांगितले होते की तिच्या बबली इमेजच्या मागे किती वेदना दडलेल्या आहेत. आयुष्यात कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे सांगताना तिच्या भावना दाटून आल्या. तिच्या वेदना सांगताना राखी सावंत म्हणाली होती, “मी रडते, काल रात्री मी खूप रडले. अन्न खाल्ले की नाही, हे विचारायला कुणी येत नाही. आई राहायची तेव्हा विचारायची जेवलीस का?”.
राखीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी ट्रोलिंगचा भडीमार केला आहे. एका यूजरने म्हटले, “राखी आम्हाला कधीच निराश करत नाही”. एकजण म्हणाला, “तिचा ड्रेस कचरा आहे”. दुसरा म्हणाला, “ही राखी सावंतची आभा आहे”. काहींनी विनोदी स्वरात म्हटले आहे, “ती स्वस्त किम कार्दशियन आहे”. एकाने दुःख व्यक्त केले आणि म्हटले, “मला त्यांच्याबद्दल वाईट वाटते”. कोणीतरी प्रश्न विचारला आहे, “तिच्यासाठी कोणी प्रार्थना केली?”.
आणखी वाचा – चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार
ती म्हणाली होती, “घरी आल्यावरही स्मशानभूमी वाटते, कोणी विचारणार नाही. आयुष्यात कोणी नाही. माझ्यात पुन्हा लग्न करण्याची हिम्मत नाही. माझ्यात पुन्हा लग्न करण्याची हिम्मत नाही, ते मला लुटतील. त्याला बायको नको आहे, त्याला शिडीसारखे चढायचे आहे. माझा माझ्या आयुष्यावरील विश्वास उडाला आहे. मी कशी चिखलातून आले आहे”.





