purna aaji replacement : ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असलेली मालिका आहे. या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेने आजवर रसिकांच्या मनात घर केलं आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकवर्गाचं प्रेम मिळवलं आहे. इतकंच नाहीतर काही दिवसांपूर्वी या मालिकेतील पूर्णा आजी उर्फ ज्योती चांदेकर यांच्या अचानक आलेल्या निधनाच्या बातमीने साऱ्यांना धक्का बसला. गेल्या अडीच वर्षांपासून दिवंगत अभिनेत्री ज्योती चांदेकरने पूर्णा आजी ही भूमिका साकारली. १६ ऑगस्टला आजारपणामुळे त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर आता मालिकेतील ही भूमिका कोण साकारणार यावरून अनेक चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या.
पूर्णा आजीच्या भूमिकेत कोणालाही रिप्लेस करु नका अशी विनंती अनेकांनी केलेली पाहायला मिळाली. निर्मात्यांनी अद्याप या मुद्द्यावर काहीही भाष्य केलेलं नाही. दरम्यान, लवकरच पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी एका नव्या अभिनेत्रीची मालिकेत एंट्री होणार असल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर सध्या नव्या पूर्णा आजीच्या भूमिकेतील एका अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा, तसेच अभिनेत्री जुई गडकरी, अमित भानुशाली आणि दिग्दर्शक यांनी कथानक पाहून योग्य तो निर्णय घ्यावा लागेल असं म्हटलं होतं.
आणखी वाचा – “एकटेपण मला खात होतं”, ५१ व्या वर्षी एकटेपणाला वैतागली सुप्रसिद्ध अभिनेत्री, लेकही बरोबर राहत नाही आणि…
‘ठरलं तर मग’ मालिकेत येत्या काळात ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस पूर्णा आजीच्या भूमिकेत झळकतील असा अंदाज वर्तवला जात आहे. सोशल मीडियावर त्यांच्या फोटोच्या पोस्टही व्हायरल झाल्या आहेत. स्वाती चिटणीस या ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत अर्णवच्या आजीची भूमिका साकारत होत्या. मात्र, नुकतीच त्यांनी ‘तू ही रे माझा मितवा’मधून एक्झिट घेतली आहे. त्यामुळे स्वाती चिटणीसच पूर्णा आजी साकारणार असा दावा काही नेटकऱ्यांनी केला आहे.
आणखी वाचा – “मी अगदी ठीक आहे”, अपघाताने मृत्यू झाल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “खोट्या बातम्या…”
स्वाती चिटणीस पूर्णा आजीची भूमिका साकारणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. वा ‘स्टार प्रवाह’ किंवा ‘ठरलं तर मग’च्या टीमने याबाबत काहीही सांगितलेलं नाही. त्यामुळे या मुद्द्यावर चॅनेल कोणता निर्णय घेणार?, पूर्णा आजीची खरीच रिप्लेसमेंट होणार का?, या गोष्टी येत्या काही दिवसांत स्पष्ट होतील.





