शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्यावेळी जातीचे रंग…”, धूलिवंदननिमित्त कुशल बद्रिकेने शेअर केलेल्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला, “माझ्या आयुष्याची होळी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 25, 2024 | 4:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kushal Badrike shared a special post on social media on the occasion of Holi

“त्यावेळी जातीचे रंग...”, धूलिवंदननिमित्त कुशलने शेअर केलेल्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला, “माझ्या आयुष्याची होळी...”

संपूर्ण देशभरात होळी व धूलिवंदन या सणांचा उत्साह पाहायला मिळत आहे. सामान्य लोकांपासून मोठमोठ्या कलाकारांपर्यंत सर्वांनी होलिका दहन करून होळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला आणि आज सगळे जण धूळवड साजरी करत आहेत. आज सर्वत्र प्रेमाचे, उत्साहाचे, आनंदाचे आणि आठवणींचे रंग उधळले जात आहेत. अनेक कलाकार सोशल मीडियावर आपले फोटो व्हिडीओ शेअर करून आपल्या धूलिवंदन सेलिब्रेशनची झलक चाहत्यांना दाखवत आहेत. याच निमित्ताने कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. मात्र या फोटोखाली लिहिलेल्या कॅप्शनमुळे त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कुशलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे आजच्या धुळवडीचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोखाली कॅप्शनमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “माझ्या आयुष्याची होळी गेली कित्येक वर्ष “फ्लॅट” संस्कृतीत पेटत आहे. पण माझी खरी होळी रंगली ती माझ्या बालपणी आमच्या “चाळीत”. माझे पप्पा पहाटे चारला उठायचे आणि दिड-दोनशे फुगे पाण्याने भरून ठेवायचे. मग रंग भरल्या पिचकारीची बंदूक आणि फुग्यांचे बॉम्ब घेऊन आमची वानरसेना दिसेल त्याच्यावर तुटून पडायची”.

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

आणखी वाचा – एकमेकांच्या प्रेमात रंगले सिद्धार्थ-तितीक्षा, लग्नानंतर साजरी केली पहिली धूळवड, अभिनेत्री खास व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझ्या आयुष्यात रंग…”

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “त्यावेळी जातीचे रंग थोडे फिकट आणि होळीचे रंग थोडे गडद होते, म्हणून कदाचित जगण्यात जे रंग उतरले त्याने अख्खं आयुष्य रंगीत करुन टाकलं. आता मुलांना फुगे भरून देताना गाठी मारून गुलाबी झालेलं ‘पप्पांचं बोट’ आपल्याच हाताला फुटलं आहे असं वाटतं आणि आता होळीत आपल्याला फुगे भरून देणारं कुणी नाही ही जाणीव बोटभर ठुसठुसत राहते.”

आणखी वाचा – तापसी पन्नू अडकली विवाहबंधनात, बॉयफ्रेंड मॅथियस बोबरोबर उदयपुरमध्ये बांधली लग्नगाठ मित्राने शेअर केले खास फोटो

कुशलने शेअर केलेल्या या फोटोमध्ये कुशलसह त्याची बायको व मुलगादेखील पाहायला मिळत आहे. तसेच काही इतर मंडळीदेखील दिसत आहेत. दरम्यान, कुशलने शेअर केलेल्या फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच या पोस्टखाली अनेकांनी त्याला होळीनिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.

Tags: kushal badrikemarathi actormarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Marathi actors actresses shared their special photos on social media and wished everyone happy holi

Holi 2024 : होळीचा सण लय भारी! मराठी कलाकारांनी साजरी केली कलरफुल धूळवड, पाहा हे खास फोटो  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.