आज धूलिवंदनाचा सण सगळीकडे उत्साहात साजरा होत आहे. राज्यभर होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सगळीकडे रंगाची बरसात होत आहे. होळीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. अशातच मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींनीही त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर अनेकांनी फोटो व व्हिडीओ शेअर करत होळी व धुळवडीच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रार्थना बेहेरे, धनश्री काडगांवकर, कश्मिरा कुलकर्णी, स्मिता गोंदकर, श्रेया बुगडे, माधवी नीमकर, तितीक्षा तावडे, सिद्धार्थ बोडके, प्रथमेश परब, पूजा सावंत, सुरेखा कुडची, पीयूष रानडे, श्रेयस तळपदे, वैदही परशुरामी, श्रुती मराठे, गौरव घाटणेकर, उर्मिला कोठारे, गिरिजा प्रभू यासंह अनेक कलाकार मंडळींनी होळी व धुलिवंदननिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच नवीन लग्न झालेल्या कलाकार जोडप्यांसाठी यंदाची होळी खास होती. बॉलिवूडसह मराठी कलाविश्वातील अनेक नवविवाहित दाम्पत्यांनी आपपल्या जोडीदराबरोबर यंदाची धूळवड साजरी केली. प्रथमेश परब, क्षितिजा घाणेकर, तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके यांनी एकमेकांना रंग लावत यंदाचे धूलिवंदन साजरे केले. त्यांचे रंगाने माखलेले काही खास फोटो व व्हिडीओ त्यांनी चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
दरम्यान आजच्या धूलिवंदनानिमित्त कुणी होळीच्या स्पेशल गाण्यांवर ठेका धरला तर कुणी रंगामध्ये न्हाऊन घेतले. मात्र आजची धूळवड अगदी दणक्यात साजरी केली. कलाकारांनी आपल्या चाहत्यांना धूलिवंडणाच्या शुभेच्छा तर दिल्याच पण चाहत्यांनी देखील आपल्या आवडत्या कलाकारांच्या या पोस्टखाली होळी व धूलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.