होळी हा भारतातील सर्वात उत्साही आणि रंगीबेरंगी सणांपैकी एक आहे. नवविवाहित जोडप्यांसाठी लग्नानंतरची पहिली होळी हा एक खास सण असतो. अशातच आज सर्वत्र धूळवड साजरी केली जात आहे. ळवडीनिमित्त आज सर्वत्र अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या धुळवडीनिमित्त खास गाण्यांवर ठेका धरत सर्वचजण धूळवड साजरी करत आहेत.
अशातच ज्या जोडप्यांचं नुकतंच नवीन लग्न झालं आहे, त्यांच्यासाठी तर ही पहिली होळी खूपच खास असते आणि मराठी मनोरंजन विश्वात अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांच्यासाठी यंदाची धूळवड ही खूपच खास आहे. अशा अनेक जोड्यांपैकी एक लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री तितीक्षा तावडे व अभिनेता सिद्धार्थ बोडके.
२६ फेब्रुवारी रोजी तितीक्षाचा सिद्धार्थबरोबर मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर त्यांचा हा पहिला होळी सण आहे. त्यामुळे सिद्धार्थ-तितीक्षा लग्नानंतरची पहिली धूळवड अगदी दणक्यात साजरी केली आहे आणि या धुळवडीच्या काही खास क्षणदेखील त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.
सिद्धार्थ-तितीक्षा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात दोघेही अनेक रंगांनी माखलेले दिसत आहेत. तसेच दोघांनी एकमेकांबरोबर रोमॅंटिक पोज देत हे फोटो काढले आहेत. आजच्या धुळवडीनिमित्त शेअर केलेल्या या खास व्हिडीओमुळे तसेच या व्हिडीओखालील कॅप्शननेदेखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
तितीक्षाने “तू माझ्या आयुष्यात अक्षरशः रंग भरत आहेस” असं म्हणत हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान, तितीक्षाने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली त्यांच्या अनेक चाहत्यांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच होळी व धुळवडीच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत.