मराठी, हिंदी मालिका, चित्रपट आणि नाटक अशा विविध माध्यमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत आपल्या अभिनयाची दखल घ्यायला लावणारी अभिनेत्री म्हणजे क्षिती जोग. आपल्या अप्रतिम अभिनयानं तिनं प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली. आजवर अभिनेत्री म्हणून नावाजलेली क्षिती निर्माती म्हणूनही चांगलीच लोकप्रिय आहे. अभिनयाव्यतिरिक्त इतर अनेक सामाजिक मुद्द्यांवर क्षिती आपलं स्पष्ट मत मांडत असते.
अशातच नुकतीच क्षितीने आरपार या युट्यूब वाहिनीला एक मुलाखत दिली. यातील तिच्या काही व्यक्तव्यांनी सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली. यावेळी क्षितीने अनेक विषयांवर संवाद साधला. यावेळी तिला तिच्या तब्येतीबद्दलदेखील “लोकांची अशी तक्रार आहे की, क्षिती स्वत:कडे लक्ष देत नाही.” असा प्रश्न विचारण्यात आला.
याचे उत्तर देत क्षिती असं म्हणाली की, “स्वत:कडे लक्ष देत नाही, हे जर वजन कमी करण्याच्या दृष्टीने असेल तर त्यांना माझा इतिहास माहीत नाही आणि हे ठिकच आहे. म्हणजे यावरून मी त्या लोकांबद्दल काहीही मत तयार करत नाही. मला स्त्रीरोगविषयक काही समस्या होत्या. त्यामुळे माझे ५-६ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यामुळे मला आता ऑपरेशन थिएटरमध्ये जाणे हे पार्कमध्ये जाण्यासारखेच वाटते आणि म्हणून इतक्या ऑपरेशन्समुळे माझं पोटंही जास्त आहे.”
आणखी वाचा – विकी कौशलने केलं मराठमोळ्या अभिनेत्याचं कौतुक, मराठी भाषेत साधला खास संवाद, म्हणाला, “संतोषबरोबर काम करणं…”
यापुढे ती असं म्हणाली की, “कृपया हेही नमूद करते की, चार-पाच तास जिममध्ये घालवूनही मी कमी होत नाही असंही काही नाही. मी त्याबाबत थोडी आळशी होते आणि वजन कमी करणे हे या सगळ्यामुळे माझ्यासाठी थोडं कठीणदेखील आहे. पण लोकांच्या तक्रारी मी समजू शकते. पण माझी माझी काही कारणे आहेत त्यामुळे हे ठीक आहे”.
क्षिती नुकतीच ‘झिम्मा २’ या चित्रपटात दिसून आली होती. सात बायकांच्या या चमूमध्येही तिने साकारलेलं पात्र एकदम उठून दिसलं आणि तिचं बरंच कौतुक सुद्धा झालं होतं. दरम्यान, क्षितीने ही मराठीसह हिंदी मालिका, चित्रपट व वेबविश्वातसुद्धा आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.