गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

किरण मानेंना मिळाली दसऱ्याच्या आदल्या दिवशी अनोख्या चाहत्यांची अनोखी भेट, तृतीयपंथीयांकडून मिळाला लाखमोलाचा आशीर्वाद

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 24, 2023 | 11:24 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kiran Mane Shared Fan Moment

किरण मानेंना मिळाली दसऱ्याच्या आदल्या दिवशी अनोख्या चाहत्यांची अनोखी भेट, तृतीयपंथीयांकडून मिळाला लाखमोलाचा आशीर्वाद

मराठमोळे अभिनेते किरण माने नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. विशेष म्हणजे विविध विषयांवर बेधडकपणे मत मांडण्यात हा कलाकार कधीच मागे हटत नाही. त्यांची ही धाडसी वृत्ती कित्येक प्रेक्षकांना आवडते तर काहींना खटकते. बरेचदा या कलाकारालाही ट्रोलिंगचा सामना करावा लागतो मात्र ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत ते नेहमीच भाष्य करतात. किरण माने यांचा स्वतःचा असा खूप मोठा चाहतावर्ग आहे. नेहमीच ते त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. नुकतीच एक फेसुबक पोस्ट शेअर करत किरण माने यांनी त्यांच्या अनोख्या चाहत्यांच्या भेटीबद्दल भाष्य केलं आहे. (Kiran Mane Shared Fan Moment)

किरण माने यांनी त्यांच्या या स्पेशल चाहत्यांबरोबरचे फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सध्या साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. काही तृतीयपंथी मंडळींनी किरण माने यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीदरम्यानचा अनुभव किरण माने यांनी शेअर करत म्हटलं आहे की, “आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या अनोख्या चाहत्यांनी दसर्‍याच्या आदल्या दिवशीच माझा दिवस सोन्याचा केला ! काल अचानक काही तृतीयपंथी लोक अत्यंत प्रेमानं, आवर्जुन, खास माझा पत्ता शोधत मला भेटायला आले.”

आणखी वाचा – “आजपर्यंत बॉलिवूड कलाकारांचे…”, त्या एका फॅन मुमेंटने रुपाली भोसले भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली, “माझ्या बरोबर घडलं तेव्हा…”

“मला पाहून भारावून बोलू लागले, ‘किरणजी,तुमच्या भूमिका आमच्या काळजात कोरल्यात आम्ही. विलास पाटील आणि सिंधुताईंचे वडील पाहिल्यानंतर कायम वाटायचं असा बाप आम्हाला लाभायला पाहिजे होता. मलाही चिंधीसारखीच शिकायची आवड होती. बिगबॉसमध्ये असताना तुम्हाला खूप व्होटिंग केलं आम्ही’, ऐकताना माझे डोळे पाणावत होते. खास माझ्यासाठी खंडोबाच्या गाण्यावर त्यांनी डान्स केला. ‘आम्ही वरचेवर तुम्हाला भेटायला येऊ. प्रत्येक वेळी यशाची पायरी वर चढलेली दिसणार आहे आम्हाला. तुम्ही खूप खूप मोठे व्हाल. सुपरस्टार व्हाल. जगात नांव होईल. आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.’ असं म्हणून लाखमोलाचा आशिर्वाद देऊन गेले.”

आणखी वाचा – “तुम्ही त्याच्या आयुष्याचं…”, नातेवाईकांनी स्वप्नील जोशीच्या आई-वडिलांना सुनावले खडेबोल, म्हणाला, “तेव्हा मी बाबांना…”

“बाकी काहीही असो भावांनो, ही अशी माया खूप कमीजणांना लाभते. फॅन्सच्या ‘लाईव्ह’ प्रेमाबाबतीत मी खूप म्हणजे खूप भाग्यवान आहे ! कलाकार आहे मी. जसे चाहते आहेत, तसे काही निंदक, ट्रोलही आहेत. पण माझा द्वेष करणार्‍यांचा मला जरासुद्धा राग येत नाही. कारण त्यांच्यामुळंच तर माझ्या चाहत्यांच्या अफाट प्रेमाची किंमत किती मोलाची आहे, हे मला कळतंय. बहुत छोटे हैं मुझ से मेरे दुश्मन.. जो मेरे चाहनेवाले हैं, मुझ से बड़ॆ है ! लब्यू – किरण माने.” अशी आशयघन व भावुक करणारी पोस्ट किरण माने यांनी शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलेलं पाहायला मिळतंय.

Tags: bigg bossentertainmentkiran manekiran mane shared fan momentmarathi actormarathi malikamarathi moviemarathi serialsindhutai mazi aai
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Anushka Sarkate Kelvan
Entertainment

Video : अनुष्का सरकटेच्या केळवणाचा न्याराच थाट, ‘वचन दिले तू मला’ मालिकेची टीम हजर, खास पदार्थ अन्…

जून 18, 2026 | 10:29 am
 rakhi sawant latest video
Entertainment

४८ वर्षांची आहे राखी सावंत?, वेस्टर्न लूक पाहून नेटकरी अवाक, ट्रोलही केलं, म्हणाले, “ती स्वस्त…”

जून 18, 2026 | 9:58 am
Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
Next Post
Vishakha Subhedar On Nivedita Saraf

"हे पटत नाहीये…", निवेदिता सराफ यांच्या 'नाट्यगृहांचं खासगीकरण व्हावं' या विधानाला खोडून काढत विशाखा सुभेदारचं स्पष्ट मत, म्हणाली, "नाटक हा खेळ…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.