कलाकार मंडी म्हटलं की त्यांचा चाहतावर्ग हा आलाच. प्रत्येक कलाकाराचा असा स्वतःचा चाहतावर्ग असतो. बरेच फॅन मुमेंट असतात, आणि ही कलाकार मंडळी हे फॅन मुमेंट कायमच शेअर करत असतात. अशातच लोकप्रिय व मराठमोळ्या अशा एका अभिनेत्रीने तिची एक फॅन मुमेंट शेअर केली आहे. ही मराठमोळी अभिनेत्री म्हणजे ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील रुपाली भोसले. मालिकेतील संजना या पात्रामुळे रुपाली ओळखली जाते. (Rupali Bhosale Shared Fan Moment)
रुपालीने आजवर बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे. शिवाय मराठी ‘बिग बॉस’मध्येही झळकली होती. मात्र रुपालीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली ती म्हणजे तिच्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील भूमिकेमुळे. या मालिकेतील संजना या पात्राने रुपालीला खरी ओळख मिळवून दिली. अभिनयातून तर तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलंच आहे. या मालिकेत रुपाली नकारात्मक भूमिकेत असली तरी प्रेक्षक तिच्या या नकारात्मक भूमिकेला, तिच्या अभिनयाला कायमच दाद देताना दिसतात.
तिच्या या मालिकेतील भूमिकेची ख्याती सर्वदूर पसरली आहे. नुकताच विमान प्रवासादरम्यान याची तिला प्रचिती आली. विमान प्रवासादरम्यानची एक फॅन मुमेंट रुपालीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. केबिन क्रू बरोबरच फोटो शेअर करत रुपाली म्हणाली, “हे खूप आश्चर्यकारक आहे. आज पर्यंत बॉलीवूड कलाकारांचे असे फोटो किंवा केबिन क्रू त्यांच्या बरोबर फोटो काढत आहेत, त्यांना काहीतरी भेटवस्तू देत आहेत, असे फोटो पाहिले होते. पण आज जेव्हा माझ्या बरोबर हे घडलं तेव्हा खरंच खूपचं छान वाटलं. का माहित नाही पण डोळे पाणावले, थोडी इमोशनल झाले पण चेहऱ्यावर एक स्माईल सुद्धा आली”, असं म्हणत तिने केबिन क्रू व इंडिगो फ्लाईटच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.
रुपालीचा या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तीच कौतुक केलं आहे. सोशल मीडियावरही रुपाली बऱ्यापैकी सक्रिय असते. ती नेहमीच रील्स व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. शिवाय रुपाली तिच्या अभिनयाव्यतिरिक्त फोटोशूटमुळे चर्चेत असते. रुपालीचं हटके फोटोशूट प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस पडतं.