रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कमी लेखलं, कामंही मिळेना अन्…”, ‘खिचडी’मधील राजीव मेहता यांच्यावर अशी वेळ का आली?, म्हणाले, “माझ्याकडे दुर्लक्ष…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 11, 2024 | 2:33 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rajeev Mehta on movie roles

"कमी लेखलं, कामंही मिळेना अन्...", 'खिचडी'मधील राजीव मेहता यांच्यावर अशी वेळ का आली?, म्हणाले, "माझ्याकडे दुर्लक्ष..."

‘खिचडी’या चित्रपटाने सर्वांनाच खळखळवून हसवले आहे. या चित्रपटातील प्रफुल्ल,हंसा,हिमांशु,बाबूजी,जयश्री या सर्वांनीच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. हंसाची भूमिका साकारणाऱ्या सुप्रिया पाठक यांची लोकप्रियता दिवसागणिक वाढत आहे. पण प्रफुल्लची भूमिका साकारणारे राजीव मेहता हेही अधिक प्रसिद्ध आहेत. पण त्यांनी मालिका व चित्रपटांमध्ये चांगल्या भूमिका न मिळाल्याची खंत बोलून दाखवली आहे. (Rajeev Mehta on movie roles)

‘खिचडी’ हा विनोदाचा हलका फुलका शो प्रेक्षकांनी अधिक पसंत केला.प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. पण आता मालिका व चित्रपटांमधून मिळणाऱ्या भूमिकांवर त्यांनी भाष्य केले आहे. त्यांनी नुकतीच एका माध्यमाला मुलाखत दिली आहे. ते म्हणाले की, “मला आतापर्यंत कमी लेखण्यात आलं. ‘खिचडी’सारखा शो आणि चित्रपटामध्ये काम केल्यानंतरही मला निर्मात्यांकडून चांगल्या ऑफर्स आल्या नाहीत. मी ‘रंगीला’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले पण माझ्यावर कोणीही तितके लक्ष दिले नाही. पण त्यामध्ये आमिरबरोबर केलेली वेटरची भूमिका मात्र हीट झाली. ही भूमिका खूप लहान होती. पण यामधील संवाद हसवणारे होते”.

आणखी वाचा – “खूप रट्याळ आणि…”, ‘सातव्या मुलीची…’ची मालिका प्रेक्षकांना पाहवेना; नेत्रा दिसत नसल्यामुळे हैराण, ट्वीस्ट पाहून म्हणाले, “नेत्राला…”

View this post on Instagram

A post shared by Rajiv Mehta (@actor_rajivmehta)

पुढे ते म्हणाले की, “बुढ्डा होगा तेरा बाप’या चित्रपटामध्ये काम केले. तो चित्रपट इतका चालला नाही पण त्यातील भूमिका मी खूप एंजॉय केली होती. मी आता नीरज पांडे याच्या चित्रपटामध्ये काम करत आहे. हुशार निर्मात्यांबरोबर काम केल्यानंतरही चांगल्या भूमिका मिळाल्या नाहीत. मी ‘बा,बहू और बेबी’ सारख्या मालिकेमध्येही काम केले आहे. मला कधीही मालिका व वडील किंवा सासऱ्यांची भूमिका करायची नव्हती. सध्या मालिकांचा चांगला कंटेंट बनत नाही आहे”.

आणखी वाचा – ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधील अधिपतिचा अशोक सराफ यांच्या हस्ते सन्मान, भावुक होत स्टेजवरच पाया पडला अन्…; म्हणाला, “दहा वर्षांनी…”

२०१०मध्ये आलेल्या ‘खिचडी’ या चित्रपटाला खूप पसंती मिळाली. त्यामुळे निर्मात्यांनी १३ वर्षांनी चित्रपटाचा सिक्वल आला. पण ‘खिचडी २’ने कोणतीही जादू दाखवली नाही. खिचडीव्यतिरिक्त राजीव सारभाई व्हर्सेस साराभाई’, एक दुसरे से करते है प्यार हम’, ‘बडी दूर से आये हम’ या मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. तर ‘बेटा’,’सत्या’,’हेरा फेरी’, ‘खिलाडी ४२०’ ‘वक्त’ या चित्रपटांमध्येही भूमिका साकरल्या आहेत.

Tags: Actor Rajeev Mehtahindi movieHindi serialkhichadikhichadi moviekhichdi show
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Farah Khan On Rakhi Sawant

"बुरख्याच्या आत बिकिनी घालून आली अन्…", राखी सावंत 'मैं हूं ना'च्या वेळी केला होता कहर, फराह खानचा खुलासा, म्हणाली, "तिच्याबरोबर काम…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.