झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका गेले काही दिवस प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेतील रहस्यमय कथानकामुळे ही मालिका दिवसेंदिवस रोमांचक व रहस्यमय होत आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. मात्र मालिकेतील काही लेटेस्ट ट्विस्टमुळे काहगि प्रेक्षकांचा हिरमोड झाला असून याबद्दल प्रेक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे नुकतंच या मालिकेचा एक नवीन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे आणि या नवीन व्हिडीओमध्ये अस्तिकाला चक्कर येत असल्यामुळे तिला त्रास होतो आहे. यावर फाल्गुनी घरातल्या अद्वैत, रुपाली व सर्वांना आवाज देत बोलवताना दिसत आहे. अस्तिकाची होणारी अवस्था पाहून फाल्गुनीसह सगळेच जण चिंतेत पडतात. मात्र मालिकेतला हा ट्विस्ट अनेकांना आवडला नसून नेटकऱ्यांनी याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
या व्हिडीओखाली अनेक प्रेक्षकांनी नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करत या नवीन ट्विस्टला त्यांची नापसंती दर्शवली आहे. अनेकांनी या व्हिडीओखाली “आता ही मालिका फालतू झाली आहे, आधी ही मलिका उत्तम होती, पण आता ही मालिका रट्याळ झाली आहे. अस्तिका हे पात्र खूपच रट्याळ आहे. तिला या मालिकेतून काढलं पाहिजे. अतिशय थर्ड क्लास मालिका, फालतू व रट्याळ अभिनय आहे, कसला भंगार अभिनय करते ही. हिला नकारात्मक भूमिका शोभत नाहीत”. अशा अनेक कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – “त्या पुरुषांनी रात्री एका तासाची सोय होईल का? विचारलं अन्…”, वनिता खरातने सांगितला ‘तो’ धक्कादायक अनुभव, म्हणाली, “त्यांनी मला बघून…”
तसेच अनेकांनी या व्हिडीओखाली अस्तिकाऐवजी नेत्राला मालिकेत पुन्हा आणण्याची मागणी केली आहे. “नेत्राची आतुरतेने वाट पाहत आहे. बहुदा ती महाएपिसोडनंतर परत येईल. नेत्राची आता खूपच आठवण येत आहे, आशा आहे की, ती लवकरच परत येईल. काहीही करून नेत्राला मालिकेत परत आणा. आता आम्हाला नेत्राला मालिकेत पाहायचे आहे”. अशा अनेक कमेंट्स करत मालिकेत नेत्रा म्हणजेच तितीक्षा तावडेला पुन्हा एकदा बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
दरम्यान, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आता या मालिकेत पुढे आणखी नवीन काय पाहायला मिळणार यांचीही प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे.