गुरूवार, मे 22, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधील अधिपतिचा अशोक सराफ यांच्या हस्ते सन्मान, भावुक होत स्टेजवरच पाया पडला अन्…; म्हणाला, “दहा वर्षांनी…”

सौरभ जाधवby सौरभ जाधव
मार्च 11, 2024 | 2:12 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hrishikesh Shelar Share Emotional Post For Ashok Saraf

Hrishikesh Shelar Share Emotional Post For Ashok Saraf

प्रत्येकाच्या आयुष्यात आपला असा एक आवडता कलाकार असतो ज्याचा अभिनय पाहून त्यांना भेटायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मराठी मालिका विश्वातील अशाच एका कलाकाराचं हे स्वप्न नुकतंच पूर्ण झालं आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील अभिनेता हृषीकेश शेलार आणि जेष्ठ अभिनेते, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांची एका कार्यक्रमा दरम्यान नुकतीच भेट झाली. हृषीकेश ने या कार्यक्रमातील अशोक सराफ यांच्या बरोबरचे काही फोटो शेअर करत भावूक कॅप्शन देखील दिलं आहे. (Hrishikesh Shelar Share Emotional Post For Ashok Saraf)

हृषीकेशने फोटो शेअर करत लिहिलं आहे “दहा वर्षांपूर्वी आपल्या जवळच्या एका शहरात आपल्या सगळ्यात लाडक्या नटाचं नाटक आलेलं असतं. आपण आपल्या जिगरी दोस्ताबरोबर आपल्या ‘त्या’ आवडत्या नटाचे डायलॉग म्हणत म्हणतच दीड-दोन तासाची रपेट मारुन नाटकाला पोहचतो. पडदा उघडतो, ‘ते’ स्टेज वर येतात, आपण त्यांना पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहतो.. आणि पाहतच राहतो. हाच तो नट ज्याने आपलं बालपण सुंदर केलं,आनंदी केलं.. हाच तो नट जो आपल्याला इतका आपलासा वाटतो,जवळचा वाटतो, की तो आपल्या स्वप्नात येतो. आपण संभ्रमात.. हे सत्य आहे की तेच स्वप्न सुरु आहे?

View this post on Instagram

A post shared by Hrishikesh Shelar (@hrishishelar)

आणखी वाचा- सर्वाधिक ऑस्कर पुरस्कार जिंकणारा ‘Openheimer’ चित्रपट OTT वर कुठे पाहता येणार? जाणून घ्या…

नाटक संपल्यावर त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी बॅक स्टेजला मोठी रांग असते. आपणही त्या गर्दीत सामील होतो, अर्धा तास रांगेत थांबून शेवटी आपल्या सुप्परस्टारच्या जवळ पोहोचल्यावर अचानक काहीतरी वाटतं आणि आपण फोटो न काढताच रांगेतून बाजूला होतो आणि दोस्ताला कानात म्हणतो मला ‘गर्दी’ म्हणून नाही भेटायचं यांना. मी भेटणार नक्की, पण आत्ता असं नाही. बॅक स्टेजला घुटमळत आमच्या भेटीचा तो क्षण आपण लांबणीवर टाकून देतो, अनिश्चित काळासाठी. आपण परत संभ्रमात.. हा शहाणपणा की मूर्खपणा?”.(Hrishikesh Shelar Share Emotional Post For Ashok Saraf)

आणखी वाचा- “लक्ष्मीकांतने हळूहळू स्वतःला संपवलं, कोणाचंही न ऐकता…”, लक्ष्मीकांत बेर्डेंच्या भावाचं मोठं विधान, म्हणाले, “बायकोचं ऐकलं असतं तर…”

“त्यानंतर बरोबर दहा वर्षांनी, आता स्टेजवर आपल्या ‘त्या’ सुप्परस्टारच्या हस्ते आपला सत्कार होतो, ते आपल्या कामाचं कौतुक करत असतात आणि त्यांचे शब्द स्लोमोमध्ये आपल्या कानावर हळुवार मोरपिसासारखे..! अगदी तसंच जसं आपण अनेकदा आपल्या स्वप्नात पाहिलंय. आपला आपल्या कानांवर-डोळ्यांवर विश्वास बसत नाही आपण थेट त्यांचे पाय धरतो, स्लोमो मध्येच. बॅकस्टेच्या रांगेतला मी, स्टेजवरच्या माझ्याकडे पाहून हसतो; आणि आपण परत एकदा कंटिन्युटी मध्ये संभ्रमात..हे सत्य आहे की तेच स्वप्न पुढे सुरु आहे?”(Hrishikesh Shelar Share Emotional Post For Ashok Saraf)

हृषीकेशने शेअर केलेल्या या फोटोंवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत त्याचं कौतुक केलं आहे. हृषीकेशने यापूर्वी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ य मालिकेत खलनायकी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. तर सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून हृषीकेश घराघरात पोहचला आहे.

Tags: ashok sarafhrishikesh shelartula shikvin changlach dhada
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raja Shivaji Release Date Announced
Entertainment

मोठी घोषणा! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची तारीख समोर, सहा भाषांत होणार प्रदर्शित

मे 21, 2025 | 6:27 pm
Vaishnavi Hagwane Death
Social

पैशांसाठी मारहाण, नणंद तोंडावर थुंकली अन्…; पुण्यातील घरंदाज कुटुंबातील सूनेची आत्महत्या, आई-वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

मे 21, 2025 | 5:54 pm
Sunil Shetty on Pahalgam attack
Entertainment

पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड शांत का?, सुनील शेट्टी स्पष्टच बोलले, म्हणाले, “बोललं की शिवीगाळ होते आणि…”

मे 21, 2025 | 4:09 pm
Viral Video
Entertainment

Viral Video : भर रस्त्यात नवऱ्याकडून पत्नीला मारहाण, बाळालाही फेकलं अन्…; पालक म्हणून हरले…

मे 21, 2025 | 2:50 pm
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi serial audience expressed displeasure over the new twist

"खूप रट्याळ आणि…", 'सातव्या मुलीची…'ची मालिका प्रेक्षकांना पाहवेना; नेत्रा दिसत नसल्यामुळे हैराण, ट्वीस्ट पाहून म्हणाले, "नेत्राला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.