Kareena Kapoor Looks Uncomfortable : बॉलिवूडमधील कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कपूर परिवारातील सदस्यांची विशेष चर्चा रंगलेली असते. यापैकी अभिनेत्री करीना कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत असते. दरम्यान करीना कपूरचा एक व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे, ज्यामध्ये तिला विमानतळावर चाहत्यांनी घेरलेलं दिसत आहे. मात्र, या व्हिडीओमध्ये ती केवळ चाहत्यांनी घेरलेली दिसत नाही तर ती खूपच घाबरलेलीही दिसत आहे. व्हिडीओमध्ये करीना आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांना टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे आणि खूपच अस्वस्थ दिसत आहे. करिनाचा हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक प्रचंड संतापले आहेत.
व्हिडीओ पाहताच प्रेक्षकांनी करीनावर नाराजी दर्शवली असं वाटत असले तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. खरं तर, करिना इतकी अस्वस्थ होत आहे हे प्रेक्षकांनाही आवडलेलं नाही आणि लोकांनी तिला अशा प्रकारे घेरणं चुकीचं आहे. या व्हिडीओमध्ये करीना तिथे उपस्थित असलेल्या गर्दीपासून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि कसेतरी पुढे सरकत आहे. मात्र, लोक तिला इतक्या सहजासहजी जाऊ देत नाहीत आणि सतत समोर येऊन तिच्यासह सेल्फी घेताना दिसत आहेत. यावेळी करीनाही कोणतीही पोज देण्याच्या मनस्थितीत नाही आहे. ना तिच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे. हे पाहून तिचे चाहते संतापले आहेत.
या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी असे म्हटले आहे की, “हे खूप दुःखद आहे, करिनाने धीर धरायला हवा”. तर दुसऱ्या एकाने म्हटलं आहे की, “लोक सेलिब्रिटींना का अडवतात हे मला समजत नाही”. तर आणखी एकाने लिहिले आहे की, “असभ्य लोकांची कमतरता नाही, ते पाहत आहेत की करीना कशी अस्वस्थ होत आहे, तरीही ते समजू शकत नाहीत”. तर एकजण म्हणाला, “हे पूर्णपणे चुकीचे आहे, सेल्फी घेण्यापूर्वी सेलिब्रिटींना एकदा विचारुन पहा”.
आणखी वाचा – वयाच्या ५३ व्या वर्षीही अविवाहित असण्याच्या प्रश्नांना कंटाळली तब्बू, थेट उत्तर देत म्हणाली, “लोकांना…?”
करीनाबरोबर असे पहिल्यांदाच घडले आहे असे नाही. याआधीही तिला अनेकवेळा चाहत्यांच्या गर्दीने घेरले आहे. याआधीही अनेकदा असे घडले आहे की, विमानतळावर पोहोचताच त्यांचे सामान गाडीतून बाहेर पडले नाही आणि लोकांनी तिला फोटोसाठी घेरले.