बॉलिवूडमध्ये स्टारकीड्सची सध्या खूप चलती आहे. करीना कपूरचा लेक तैमुरनंतर रणबीर कपूर व आलिया भट्ट यांची लेक राहा कपूर खूप चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राहा कॅमेरासमोर दिसून येत आहे. नाताळ निमित्ताने स्टारकीडचा नवीन व्हिडिओ समोर आला होता. ख्रिसमसच्या दिवशी राहा पुन्हा एकदा माध्यमांसमोर आली. यावेळी न घाबरता, न लाजता तिथे उभ्या असलेल्या पापाराझींना हाय करत फ्लाइंग किस दिले. राहाचा हा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अशातच राहाच्या अजून एका व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या गोड अदांनी लक्ष वेधले आहे. (raha kapoor new video)
राहाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुन्हा एकदा तिने चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जी दिसून येत आहे. तसेच रणबीर कपूरकडे राहा दिसून येत आहे. राहा मान वाकवून कॅमेराकडे बघताना आहे. यामध्ये ती खूपच गोड दिसत आहे. नंतर रणबीर तिला घेऊन येतो. यावेळी ती नेहमीप्रमाणेच रणबीरला बिलगून असलेली दिसत आहे. नंतर बाप-लेक दोघंही गाडीत बसून निघून जातात.
आणखी वाचा – घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युजवेंद्र चहल ‘बिग बॉस १८’मध्ये दिसणार?, नेमकं सत्य काय?
दरम्यान काही दिवसांपूर्वी राहा रणबीर व अलियाबरोबर एअरपोर्टवर दिसून आली होती. यावेळी तिने पापाराझीना उत्साहाने बाय म्हंटलं आणि फ्लाइंग किसदेखील दिले. राहाच्या या कृतीने आलियाला खूप हसू येते. तसेच रणबीरदेखील हसू लागतो. दरम्यान हा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
राहाचेअनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना बघायला मिळतात. राहाचा जन्म ६ नोव्हेंबर २०२२ रोजी झाला. नुकताच राहाचा दूसरा वाढदिवस पार पडला. मुंबई येथील वांद्रे येथे पार पडला. तिच्या वाढदिवसासाठी अनेक कलाकारांनीदेखील हजेरी लावली होती. राहाच्या वाढदिवसाचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील समोर आले होते.