बॉलिवूड अभिनेत्री तब्बू सध्या पुन्हा एकदा खूप चर्चेत आली आहे. ८०-९० च्या दशकामध्ये तिने याने सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मध्यंतरीच्या काळात ती मनोरंजन क्षेत्रापासून लांब राहिली होती. मात्र नंतर तिने वेबसीरिज व चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा अभिनय करण्यास सुरुवात केली. तब्बू आता ५३ वर्षांची आहे. मात्र अजूनही ती अविवाहित आहे. तब्बूप्रमाणे अनेक बॉलिवूड अभिनेत्री अविवाहित आहेत. मात्र अनेकदा ती लग्न न करण्याच्या प्रश्नांवर सडेतोड उत्तर देताना दिसते. बऱ्याच वेळा ती या प्रश्नांना कंटाळलेलीदेखील दिसते. (tabu on wedding)
काही दिवसांपूर्वी तब्बूला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले. तेव्हा तिने सांगितले की असे प्रश्न कंटाळवाणे वाटत असल्याचे सांगितले. ती मस्करीमध्ये म्हणाली, “माहीत नाही लोकांना माझ्या आयुष्यात वाकून बघायची काय गरज असते ते”. तसेच ‘हिंदुस्थान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्येही ती म्हणाली की, “लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात काहीही अर्थ नाही”. तसेच तिने लोकांना उलट प्रश्न विचारला की, “माझं सायकॉलॉजिकल अनालिसिस का करायचं आहे लोकांना? लग्नाबद्दलचा प्रश्न विचारून काय साध्य करायचं आहे?”.
दरम्यान तब्बू सोशल मीडियावरदेखील अधिक सक्रिय असलेली बघायला मिळते. काही दिवसांपूर्वी तिचे काही फोटो समोर आले होते. यामध्ये तिचा सुंदर असा सिल्क गाऊन दिसून आला होता. यामध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. वयाच्या ५३ व्या वर्षीही तिचं सौंदर्य पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
तब्बूच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर,तिचा ‘क्रू’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला होता. या चित्रपटांमध्ये तिच्या बरोबर करीना कपूर, क्रिती सेनॉन, कपिल शर्मा, दिलजित दोसांझ हे कलाकार दिसून आले होते. आता ती अक्षय कुमारबरोबर ‘भूत बंगला’मध्ये दिसून येणार आहे. अक्षयने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटामध्ये परेश रावल, राजपाल यादव व असरानी हे कलाकार दिसून येणार आहेत. हा चित्रपट २ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.