Udit Narayan News : काही दिवसांपूर्वी गायक उदित नारायण यांच्या इमारतीमध्ये आग लागली असल्याची बातमी समोर आली होती. या घटनेमध्ये त्यांच्या एका शेजाऱ्याचादेखील मृत्यू झाला असल्याचं समोर आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, ६ जानेवारीला रात्री ९.१५ वाजता अंधेरी येथील शास्त्रीय नगरमधील उदित नारायण यांची इमारत ‘स्कायपॅन’ अपार्टमेंटमध्ये आग लागली होती. काही वेळातच ही आग झपाट्याने वाढली आहे. त्यानंतर आगीने रौद्ररुप धारण केले. यानंतर आता खुद्द उदित नारायण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून चाहत्यांनी प्रार्थना केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. उदित नारायण यांनीही या भीषण अपघाताचा तपशील शेअर केला आहे.
एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, त्यांच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या विंगमध्ये आग लागली. ६ जानेवारीच्या रात्री आम्हा सर्वांना इमारतीतून बाहेर काढण्यात आले. उदित नारायण म्हणाले, “पुढे काय होणार याची आम्हाला भीती वाटत होती. लिफ्ट सुद्धा बंद होती त्यामुळे मोठ्या कष्टाने आम्ही खाली उतरलो. उदित म्हणाले, “तुमच्या आशीर्वादामुळे हा गायक वाचला”. उदित नारायण हे अंधेरी येथील ‘स्कायपॅन’ इमारतीमध्ये ११व्या मजल्यावर राहतात.
इमारतीत आगीमुळे काळोख होऊन धुराचे लोट पसरल्याचे त्यांनी सांगितले. या कारणास्तव, १०८ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला खाली आणणे खूप कठीण होते. मात्र ३-४ जणांनी ३० मिनिटांत हे काम केले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे उदित नारायण यांनी सांगितले. इमारतीच्या दुसऱ्या विंगच्या ११व्या मजल्यावर राहणाऱ्या ७५ वर्षीय राहुल मिश्रा यांना आगीत जीव गमवावा लागला. मिश्रा या वृद्ध व्यक्तीला कोकिलाबेन रुग्णालयात नेण्यात आले, मात्र ते वाचू शकले नाहीत. त्याचवेळी या धोकादायक घटनेत आणखी एकजण जखमी झाला.
आणखी वाचा – ‘बिग बॉस १८’चा स्पर्धक विवियन डिसेनाच्या धर्मांतराबाबत काम्या पंजाबीचा खुलासा, “भगवान शंकराचा भक्त होता पण…”
उदित नारायण बद्दल बोलायचे झाले तर, ते ९० च्या दशकातील लोकप्रिय गायक आहेत. त्यांनी उत्कृष्ट रोमँटिक गाणी गायली आहेत. अलका याज्ञिकबरोबरची त्यांची गायन जोडी चांगलीच गाजली. आता तो अनेक रिॲलिटी शोमध्ये पाहुणे म्हणून जाताना दिसतात. येथे ते स्वतःच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित किस्से शेअर करताना दिसतात.