बॉलिवूडची पंगाक्वीन अर्थात अभिनेत्री कंगणा रनौत ही अनेक कारणांनी चर्चेत राहत असते. कंगणा तिच्या भूमिकांसह ती मांडत असलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील तिच्या मतांमुळेदेखील चर्चेत राहत असते. कंगणा नुकतीच श्रीराम जन्मभूमी अयोध्येत गेली होती. तेव्हा तिने तेथील एका हनुमान मंदिरात जादू मआर्ट सेवा केले असल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर तिने बागेश्वर बाबांचे दर्शनही घेतले. यांमुळे कंगणा चांगलीच चर्चेत आली. अशातच आता ती पुन्हा एकदा तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे.
कंगना रणौत व्यावसायिक निशांत पिट्टीला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. कंगना व निशांतचे अयोध्येतील राम मंदिरातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि त्यांच्या या व्हायरल फोटोमुळे या चर्चा होऊ लागल्या. पण अभिनेत्रीने या अफवा असल्याचं स्पष्ट केलं असून ती कुणालातरी डेट करत आहे, पण तो निशांत नाही असा खुलासाही तिने केला आहे.

आणखी वाचा – आली लग्नघटिका समीप!, प्रथमेश-क्षितिजा ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात, अनोख्या लग्न पत्रिकेने वेधलं लक्ष
कंगणाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत असे म्हटले आहे की, “माझी सर्व मीडियाला विनंती आहे की, तुम्ही कृपया कोणतीही चुकीची माहिती पसरवू नका. निशांत पिट्टी हा विवाहित असून मी सध्या दुसऱ्या कुणाला तरी डेट करत आहे. त्यामुळे कृपया योग्य वेळ येण्याची वाट बघा. एका स्त्रीने एखाद्या मुलाबरोबर फोटो काढल्यास त्याचा संबंध थेट त्यांच्या नात्याशी लावणे हे चूक आहे. कृपया असे करु नका.”
आणखी वाचा – ताज्या भाजीसाठी थेट शेतामध्ये गेली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, स्वतः केलं काम, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
दरम्यान, कंगनाचे निशांतबरोबरचे फोटो समोर आल्यानंतर त्यांनी राम मंदिराला एकत्र भेट दिल्याचं म्हटलं होतं. सोमवारी (२२ जानेवारी) उद्घाटनाच्या दिवशी दोघांनी मंदिराला भेट दिली आणि नंतर त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. ते फोटो व्हायरल झाल्यानंतर दोघांबद्दल चर्चा सुरू झाल्या, पण या फक्त अफवा असल्याचं कंगनाने स्वत: स्पष्ट केलं आहे.