बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ताज्या भाजीसाठी थेट शेतामध्ये गेली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, स्वतः केलं काम, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 25, 2024 | 10:59 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prajakta Gaikwad Video

ताज्या भाजीसाठी थेट शेतामध्ये गेली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, स्वतः केलं काम, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

मराठी कलाविश्वात बरीच अशी कलाकार मंडळी आहेत जी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. नेहमीच ही कलाकार मंडळी चाहत्यांशी संपर्क साधत काही ना काही शेअर करत असतात. विशेषतः या कलाकारांच्या रोजच्या जीवनातील घडामोडी, त्यांचा वावर जाणून घेणं प्रेक्षकांना नेहमीच आवडत. तर बरेचदा हे कलाकार स्वतःच त्यांच्या रोजच्या जीवनातील अनेक किस्से, गप्पा-गोष्टी चाहत्यांसह शेअर करत असतात. अशीच सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच प्रेक्षकांच्या संपर्कात राहणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. (Prajakta Gaikwad Video)

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने आजवर तिच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून प्राजक्ता घराघरांत पोहोचली. या मालिकेतील तिच्या येसूबाईंच्या भूमिकेमुळे प्राजक्ताला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. यानंतर अभिनेत्रीने अनेक मराठी मालिकांमधून तसेच चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

आणखी वाचा – पूजा सावंतच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या नवऱ्याची रोमँटिक पोस्ट, खास फोटो शेअर करत म्हणाला, “आपल्या नात्यात…”

View this post on Instagram

A post shared by Prajakta Gaikwad (@prajaktaa.gaikwad)

सोशल मीडियावरही प्राजक्ता बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियावरुन नेहमीच काही ना काही शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अभिनेत्रीने तिच्या गावातील शेतातून शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “त्याचं झालं असं, आजी म्हणाली कोथिंबीरच्या वड्या करुयात, मग म्हटलं आणूयात कोथिंबीर शेतात जाऊन” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने शेतात कोथिंबीर निवडतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – आली लग्नघटिका समीप!, प्रथमेश-क्षितिजा ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात, अनोख्या लग्न पत्रिकेने वेधलं लक्ष

प्राजक्ता ही शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. गावाकडचं वेड, तसेच गावातील शेतातील अनेक व्हिडीओ नेहमीच ती शेअर करत असते. प्राजक्ताच्या या व्हिडीओला अनेकांनी पसंती दर्शविली आहे. अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत, “झाल्या का कोथींबीर वड्या बनवून”, “शेतकरी”, “शेतात चप्पल नसते घालायची” अशा अनेक कमेंट केल्या आहेत.

Tags: entertainmentmarathi actressmarathi malikaprajakta gaikwadprajakta gaikwad instagramprajakta gaikwad video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Punjabi actor and singer sippy gill car accident in Canada video viral on social media

Video : सुप्रसिद्ध गायकाचा परदेशात भीषण अपघात, भररस्त्यात कार उलटली अन्…; भयानक व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.