सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आली लग्नघटिका समीप!, प्रथमेश-क्षितिजा ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात, अनोख्या लग्न पत्रिकेने वेधलं लक्ष

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 25, 2024 | 10:04 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi actor prathamesh parab and kshitija ghosalkar announces their wedding date with invitation card see the details

आली लग्नघटिका समीप!, प्रथमेश-क्षितिजा 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात, अनोख्या लग्न पत्रिकेने वेधलं लक्ष

‘आई बाबा आणि साई बाबांची शपथ घालत प्राजुसह अवघ्या महाराष्ट्राला आपल्या प्रेमात भाग पडायला लावणारा दगडू लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. दगडू फेम अभिनेता प्रथमेश परबला त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्राजु म्हणजेच त्याची जोडीदार मिळाली आहे. प्रथमेशच्या होणाऱ्या बायकोचं नाव क्षितिजा घोसाळकर असं असून गेले काही दिवस त्यांच्या केळवणाचे कार्यक्रम पार पडत आहेत. अभिनेत्याने स्वतः केळवणाचे फोटो शेअर करून ‘प्रतिजा’ ठरलं हा! बाकी तारीख लवकरच कळवतो, असं सांगितलं होतं. अशातच आता प्रथमेशने त्याच्या लग्नाची तारीख सांगितली आहे.

प्रथमेश-क्षितिजाने नुकतीच सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. प्रथमेश-क्षितिजा यांनी शेअर केलेल्या पोस्टवर दोघांचं कॅलिग्राफी डुडल असलेले फोटो पाहायला मिळत आहेत. तसेच या फोटोखाली प्रथमेश आणि क्षितिजा अशी त्यांची नावेदेखील आहेत. त्याचबरोबर दोघांच्या नावाखाली २४-०२-२४ ही तारीख लिहिली आहे. अर्थातच ही तारीख त्यांच्या लग्नाची तारीख आहे. या पोस्टखाली दोघांनी २४-०२ व ०२-२०२४ या तारखांची बेरीज करत दोन्ही तारखांपुढे इंग्रजी लिपीमध्ये ८ असे उत्तर लिहिले आहे आणि ८ या उत्तरापुढे त्यांनी Infinity असं लिहिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Kshitija Ghosalkar (@miles_in_style)

आणखी वाचा – मैत्रिणींबरोबर पाठक बाईंची सिक्कीम ट्रीप, बर्फामध्ये धमाल मस्ती करतेय अभिनेत्री, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

तसेच यापुढे क्षितिजाने प्रथमेशला असं म्हटलं आहे की, “Infinity म्हणजे अमर्याद, अगणित, अनंत, कायम… आणि तेच तू माझ्यासाठी आहेस”. त्यामुळे आता त्यांच्या लग्नाला अवघे काही दिवसच उरले असल्याचे दिसत आहे. दरम्यान, प्रथमेश-क्षितिजा यांची ही आगळीवेगळी पोस्ट चाहत्यांसह नेटकऱ्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा – “जे माझ्याबद्दल गॉसिप करतात…”, ऋता दुर्गुळेचा निशाणा नक्की कोणाकडे?, पोस्ट शेअर करत म्हणाली, “माझ्या आयुष्याचा…”

दरम्यान, प्रथमेश परबने मागच्या वर्षी व्हॅलेंटाईन डेला आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला तो क्षितिजा घोसाळकरशी साखरपुडा करणार आहे आणि त्यानंतर लगेच १० दिवसांनी दोघांचं लग्न होणार आहे. त्यांच्या या लग्नासाठी चाहते मंडळीदेखील चांगलेच उत्सुक आहेत.

Tags: entertainment newskshitija ghosalkarmarathi actormarathi entertainmentmarathi entertainment newsprathamesh parabक्षितिजा घोसाळकरप्रथमेश परबमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी मनोरंजन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Bigg Boss Marathi 6 Winner
Entertainment

‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ची विजेती ठरली तन्वी कोलते, ट्रॉफीसह मिळवली इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव

एप्रिल 20, 2026 | 10:15 am
Next Post
Pooja Sawant Birthday

पूजा सावंतच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या नवऱ्याची रोमँटिक पोस्ट, खास फोटो शेअर करत म्हणाला, "आपल्या नात्यात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.