बॉलिवूड अभिनेत्री काजोल तिच्या आगामी ‘दो पत्ती’ चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाची घोषणा झाली होती. ज्यात ती अभिनेत्री क्रिती सेननसह स्क्रीन शेअर करणार आहे. अशातच, काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या एका ओटीटी पुरस्कार सोहळ्याला काजोलने हजेरी लावली होती. यावेळी काजोलचा रेड कार्पेटवरून येतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. जो समोर येताच नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला जोरदार ट्रोल केलं आहे. (Kajol got trolled on her dress)
समोर आलेल्या या व्हायरल व्हिडिओत, काजोल काळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसून आली. ज्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. यावेळी ती उपस्थित पापाराझींना पोझ देण्यासाठी उभी राहिली. मात्र, ती या ड्रेसमध्ये पूर्णपणे अवघडल्याचं यात स्पष्टपणे दिसून आले. ज्यामुळे ती सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
हे देखील वाचा – “पप्पा किस वगैरे करतात पण…”, चित्रपटात धर्मेंद्र यांनी किसिंग सींग देण्यावरुन सनी व बॉबी देओलचं भाष्य, म्हणाले, “ते खूप…”
तिच्या या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने कमेंट केली की, “ती तिच्या मुलीचा ड्रेस परिधान करून आली, असं मला वाटतं”. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने पोट दिसत असल्याची कमेंट केली आहे. तर काहींनी तिच्या स्वभावावरून जोरदार ट्रोल केलं आहे. मात्र, काहींनी तिच्या या लूकचे कौतुक करत तिचे समर्थन केले आहे. एकूणच तिच्या या व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे. याआधीही अभिनेत्रीने एका बर्थडे पार्टीत विचित्र ड्रेस परिधान केला होता. ज्यामुळे ती त्यावेळीही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती.

दरम्यान, काजोल लवकरच ‘दो पत्ती’ चित्रपटात झळकणार आहे. ज्यात अभिनेत्री क्रिती सेनन आणि साहिर शेख महत्वाच्या भूमिकेत दिसतील. विशेष म्हणजे, क्रिती या चित्रपटाची निर्माती असणार आहे. याआधी ती ‘सलाम वेंकी’, ‘ट्रायल’, ‘त्रिभंगा’ आणि ‘लस्ट स्टोरीज 2’ यांसारख्या वेब मुव्हीज आणि वेब सीरिजमध्ये दिसली.