Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ सध्या लोकप्रियतेच्या आणि टीआरपीच्या शर्यतीत अग्रस्थानी आहे. जोरदार भांडण, मारामारी नाटकं आणि बरंच काही सध्या ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला मिळतंय. अंकिता लोखंडे-विकी जैन आणि ऐश्वर्या शर्मा-नील भट्ट या दोन कपल स्पर्धकांची सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली दिसतेय. या दोन कपल स्पर्धकांमध्ये पुन्हा एकदा वाद झालेला पाहायला मिळतोय. नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोवर ऐश्वर्या व विकी यांच्यात जोरदार भांडण झालेलं पाहायला मिळतंय.
बिग बॉस १७चा नवा प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये विकी जैनने स्पर्धक नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांच्या नात्याबद्दल पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. ज्यामुळे त्यांच्यामध्ये जोरदार वाद सुरू झालेला पाहायला मिळाला. व्हिडिओच्या सुरुवातीला, विकी नीलला विचारताना दिसतोय की, ‘डेटिंगच्या काळात ऐश्वर्याची अशी कोणती गोष्ट तुला गोंडस दिसली असं तू तिला सांगितलं’ यावर नीलने सांगितले की, मी आणि ऐश्वर्याने डेट नाही थेट लग्न केले आहे. त्यावर विकी मोठ्याने हसताना दिसला, त्यामुळे ऐश्वर्या केवळ विकीवर नाही तर अंकिताच्या पतीला न थांबवल्यामुळे नीलवरही नाराज झाली.
त्यानंतर ऐश्वर्याने विकीला “पीडित मर्द” म्हटलं आणि त्याच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान ऐश्वर्या व विकी यांच्या भांडणात हस्तक्षेप न करता अंकिता तिथेच बसली होती. त्यानंतर मात्र वाद वाढत गेल्याने तिने मध्यस्थी करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघंही कोणाचंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. ज्यावेळेला विकीला ऐश्वर्याने पीडित मर्द म्हटलं तेव्हा तिला उलट प्रश्न करत विकी म्हणाला, का तुला असं का वाटतंय?. यावर उत्तर देत ऐश्वर्याने विकीची चांगलीच कानउघडणी केली.
ऐश्वर्या असे म्हणताना दिसली की, “स्वतःची नाती जप, दुसऱ्यांच्या नात्याची चिंता करू नकोस. तुला माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या आयुष्यावर बोलायचा हक्क नाही आहे.ज्यांनी तुला तो हक्क दिला आहे त्यांना जाऊन बोल. स्वतःच स्वतःच्या लग्नाला कंटाळला आहेस. प्रत्येक माणूस तुझ्यासारखा नाही आहे” अशी जोरदार टीका ऐश्वर्याने केली.