रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉडीकॉन ड्रेस परिधान करत रेड कार्पेटवर पोहोचली काजोल, शरीरयष्टी पाहून अभिनेत्री सगळ्यांनीच उडवली खिल्ली, म्हणाले, “तुझं पोट…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 31, 2023 | 9:31 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kajol got trolled on her dress

बॉडीकॉन ड्रेस परिधान करत रेड कार्पेटवर पोहोचली काजोल, शरीरयष्टी पाहून अभिनेत्री सगळ्यांनीच उडवली खिल्ली, म्हणाले, “तुझं पोट…”

बॉलिवूड अभिनेत्री काजोल तिच्या आगामी ‘दो पत्ती’ चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाची घोषणा झाली होती. ज्यात ती अभिनेत्री क्रिती सेननसह स्क्रीन शेअर करणार आहे. अशातच, काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या एका ओटीटी पुरस्कार सोहळ्याला काजोलने हजेरी लावली होती. यावेळी काजोलचा रेड कार्पेटवरून येतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. जो समोर येताच नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला जोरदार ट्रोल केलं आहे. (Kajol got trolled on her dress)

समोर आलेल्या या व्हायरल व्हिडिओत, काजोल काळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसून आली. ज्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. यावेळी ती उपस्थित पापाराझींना पोझ देण्यासाठी उभी राहिली. मात्र, ती या ड्रेसमध्ये पूर्णपणे अवघडल्याचं यात स्पष्टपणे दिसून आले. ज्यामुळे ती सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

हे देखील वाचा – “पप्पा किस वगैरे करतात पण…”, चित्रपटात धर्मेंद्र यांनी किसिंग सींग देण्यावरुन सनी व बॉबी देओलचं भाष्य, म्हणाले, “ते खूप…”

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

तिच्या या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने कमेंट केली की, “ती तिच्या मुलीचा ड्रेस परिधान करून आली, असं मला वाटतं”. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने पोट दिसत असल्याची कमेंट केली आहे. तर काहींनी तिच्या स्वभावावरून जोरदार ट्रोल केलं आहे. मात्र, काहींनी तिच्या या लूकचे कौतुक करत तिचे समर्थन केले आहे. एकूणच तिच्या या व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे. याआधीही अभिनेत्रीने एका बर्थडे पार्टीत विचित्र ड्रेस परिधान केला होता. ज्यामुळे ती त्यावेळीही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती.

हे देखील वाचा – Bigg Boss 17 : “स्वतःच्या लग्नाला कंटाळला आहेस आणि…”, अंकिता लोखंडेच्या नवऱ्याला ऐश्वर्या शर्माने चांगलंच सुनावलं, म्हणाली, “दुसऱ्यांच्या नात्यावर…”

दरम्यान, काजोल लवकरच ‘दो पत्ती’ चित्रपटात झळकणार आहे. ज्यात अभिनेत्री क्रिती सेनन आणि साहिर शेख महत्वाच्या भूमिकेत दिसतील. विशेष म्हणजे, क्रिती या चित्रपटाची निर्माती असणार आहे. याआधी ती ‘सलाम वेंकी’, ‘ट्रायल’, ‘त्रिभंगा’ आणि ‘लस्ट स्टोरीज 2’ यांसारख्या वेब मुव्हीज आणि वेब सीरिजमध्ये दिसली.

Tags: bollywood newskajolKajol got trolled on her dress
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Prajakta Mali On AOL

श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात कोर्स करण्यासाठी गेली प्राजक्ता माळी, म्हणाली, "गुरुपूजा पंडित स्वतःला म्हणू शकते कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.