हिंदी टीव्हीवरील सर्वाधिक चर्चेत राहणारा शो म्हणजे दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो टीव्हीवर प्रदर्शित झाला होता. आता हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये अभिनेता रणवीर सिंह व दीपिका पदुकोण यांनी हजेरी लावली होती. ज्यात दीपिकाने तिच्या अफेअरबद्दल केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा रंगली. अशातच, या शोच्या नव्या भागात कोण येणार? याचीदेखील चाहते तितक्याच आतुरतेने वाट पाहत आहे. नुकतंच या शोचा नवा प्रोमो समोर आला, ज्यामध्ये ‘गदर २’ फेम अभिनेता सनी देओल व बॉबी देओल दिसले आहे. त्याचबरोबर त्यांच्या वडिलांबाबत एक मोठा खुलासादेखील या दोघा भावंडांनी यावेळी केला आहे. (Sunny and Bobby Deol in Koffee with Karan S8)
समोर आलेल्या या नव्या प्रोमोमध्ये करण सनी व बॉबीचं करिअरमधील योगदानाबद्दल उभं राहून त्याचं अभिनंदन करतो. पुढे सनीला त्याच्या ‘गदर २’च्या कमाईबद्दल विचारत असताना तो “आम्ही आमचे बॉक्स ऑफिस नंबर वाढवून सांगतो का?” असा प्रश्न केला. ज्यावर अभिनेत्याने मनमोकळेपणाने हसत उत्तर दिलं आहे. पुढे करणने बॉबी देओलला त्याच्या करिअरबद्दल एक प्रश्न विचारला. त्यावर तो म्हणाला, “सलमान खानने मला सांगितलं होतं की, जेव्हा माझ्या करिअर मध्ये चढ-उतार येत होते, तेव्हा मी तुझ्या भावाच्या पाठीवर बसलो, आणि पुढे गेलो. त्यावर मी म्हणालो, मग मामू मला तुझ्या पाठीवर बसवशील का?”
हे देखील वाचा – “घरात पाऊल ठेवायच्या आधी…”, नम्रता संभेरावच्या लेकाने तिच्यासाठीच तयार केलाय नियम, म्हणाली, “गोड मिठी…”
पुढे करणने या दोघा भावंडांना वडील धर्मेंद्र यांच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील किसिंग सीनवरून विचारलं. त्यावर बॉबीने आपली प्रतिक्रिया देताना त्याच्या चित्रपटाचं कौतुक केलं. आणि म्हणाला, “आम्ही लोक गंमत करत राहतो की पप्पा किस वगैरे करतात. पण तेव्हा सगळेच म्हणाले, की ते खूप गोड दिसत आहे.” त्यावर सनीदेखील म्हणाला की, “त्यांना जे आवडतं ते करू शकतात आणि त्यापासून दूर देखील जाऊ शकतात.”
हे देखील वाचा – बॉक्सिंग मॅचदरम्यान एकत्र आले पण रोनाल्डोने सलमान खानकडे केलं दुर्लक्ष, बाजूलाच बसला होता पण…; फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल
ओटीटी प्लॅटफॉर्म ‘डिस्नी प्लस हॉटस्टार’च्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर हा प्रोमो समोर आला. ज्यावर नेटकरी व चाहते विविध प्रतिक्रिया देत आहे. येत्या २ नोव्हेंबरला हा नवा एपिसोड ‘डिस्नी प्लस हॉटस्टार’वर प्रसारित होणार आहे. बॉबीच्या कामाबद्दल बोलायला गेल्यास, रणबीर कपूरच्या आगामी ‘ॲनिमल’ चित्रपटात तो महत्वाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. तर सनी देओलच्या ‘गदर २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे.