रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात कोर्स करण्यासाठी गेली प्राजक्ता माळी, म्हणाली, “गुरुपूजा पंडित स्वतःला म्हणू शकते कारण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 30, 2023 | 6:33 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prajakta Mali On AOL

श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात कोर्स करण्यासाठी गेली प्राजक्ता माळी, म्हणाली, "गुरुपूजा पंडित स्वतःला म्हणू शकते कारण..."

अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या चित्रीकरणाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून ध्यानधारणा करताना नेहमीच पाहायला मिळते. प्राणायाम, योग, ध्यानधारणा, संगीत, सात्विक जीवन, सात्विक जेवण, पंचकर्म, निसर्ग या गोष्टींना ती अधिक प्राधान्य देते. कामाच्या व्यस्ततेनंतर विश्रांतीसाठी ती कधी बाहेरच्या वातावरणात मनसोक्तपणे फिरायला जाते. तर कधी एखाद्या आश्रमात जाऊन मौनव्रत धारण करते. सध्या ती करिअरच्या शिखरावर असताना प्राजक्ता ‘आर्ट ऑफ लिव्हिंगचा’ ऍडव्हान्स कोर्स करतेय. (Prajakta Mali On AOL)

श्री श्री रवीशंकर यांच्या त्रिवेणी आश्रमात ती हा कोर्स करत आहे. याबाबतच्या अनेक पोस्ट तिने याआधी सोशल मीडियावरून शेअर देखील केल्या आहेत. प्राजक्ता ही श्री श्री रविशंकर यांची शिष्य असून, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या माध्यमातून ती योग क्रिया आणि मेडिटेशन करत असते. प्राजक्ताने सुरुवातीला ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चा कोर्स केला होता. त्यानंतर ती या कोर्सची ऍडव्हान्स ट्रेनिंग घेत होती. अशातच तिने ही ऍडव्हान्स ट्रेनिंग पूर्ण केल्याची खुशखबर चाहत्यांसह शेअर केली आहे.

आणखी वाचा – “जर महाराज नसते ना…”, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अश्विनी महांगडेने केलेल्या वक्तव्याची चर्चा, म्हणाली, “तुमची आडनावं मुल्ला, खान…”

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

याबाबतची एक पोस्ट नुकतीच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. आश्रमाबाहेरील फोटो तसेच आश्रमातील काही व्हिडीओ शेअर करत तिने ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चा ‘गुरुपूजा’ हा ऍडव्हान्स कोर्स पूर्ण केल्याचं सांगितलं. या पोस्टमध्ये कॅप्शन देत तिने लिहिलं आहे की, “आता मी स्वतःला “गुरुपूजा पंडित” म्हणू शकते का? काल बॅंगलोर आश्रमात ‘आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन’चा “गुरुपूजा” कोर्स पूर्ण केला. २४ देश आणि संपूर्ण भारतातून ६३० जण यांत सहभागी होते. या कोर्सला किती महत्व आहे, हे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे कुटुंब समजू शकते. आणखी एक नाव जोडलं गेलं.”

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “स्वतःच्या लग्नाला कंटाळला आहेस आणि…”, अंकिता लोखंडेच्या नवऱ्याला ऐश्वर्या शर्माने चांगलंच सुनावलं, म्हणाली, “दुसऱ्यांच्या नात्यावर…”

प्राजक्ताच्या या पोस्टखाली हा कोर्स पूर्ण केल्याबद्दल अनेकांनी तिचं अभिनंदन केलं आहे. याआधी प्राजक्ताने ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या ऍडव्हान्स कोर्ससाठी त्रिवेणी आश्रमात गेल्याची पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी तिने मौनव्रत धारण केल्याचा खुलासा केला होता.

Tags: art of livingentertainmentmaharashtrachi hasy jatramarathi actressmarathi serialmhjprajakta mali
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
abhishek kumar revealed isha malviya

Bigg boss season 17 : "मुलांचा वापर करते आणि…" अभिषेक कुमारचे ईशा मालवीयवर गंभीर आरोप, म्हणाला, "रिलेशनशिपमध्ये असताना इतर मुलांबरोबर ती…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.