पुढचं पाऊल या मालिकेने घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी, त्या मालिकेतील जुईच्या कल्याणी या पात्राने प्रेक्षकांच्या मनात कायमच स्थान मिळवलं आहे.त्या पूर्वी तुजविण सख्या रे, या मालीकेत जुईने लावण्या ही खलनायिका साकारली होती. तीच हे रूप देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होत. माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेत सोनिया म्हणून जुई पाहायला मिळाली होती.(Jui Gadkari)
मधला काही काळ जुई मालिकां पासून दूर होती.परंतु आता तिने ठरलं तर मग या मालिकेतून दमदार कम बॅक केलं आहे.नुकतेच या मालिकेचे १०० भाग पूर्ण झाले. तर,टीआरपी च्या स्पर्धेत ही मालिका सध्या अव्वल स्थानावर आहे. त्यातील जुईच्या सायली या पात्राला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. तिच्या निरागस आणि सोज्वळ अंदाजामुळे ती कायमच प्रेक्षकांच्या आवडत्या अभिनेत्रींच्या यादीत आहे.
पहा जुई शेअर करणार नवऱ्याचे फोटो (Jui Gadkari)
तसेच जुई तिच्या सोशल मीडियावर ही मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.सेटवरील ऑफस्क्रीन धमाल, अनेक मजेशीर रील देखील तिच्या इंस्टाग्राम वरून ती पोस्ट करत असते. नुकतच जुईने तिच्या इंस्टाग्राम स्टोरी वरून ask me a question या सेगमेंट मधून तिच्या चाहत्यांशी सवांद साधला. त्यात तिला एका चाहत्याने असा प्रश्न विचारला होता की,तुम्ही तुमच्या पती सोबतचे फोटो का पोस्ट नाही करत? त्या वर जुईने, ठीक आहे. मी लवकरच फोटो पोस्ट करेन असा रिप्लाय केला आहे. जुईच्या या उत्तरामुळे जुई लग्नबंधनात अडकणार का ?अशी चर्चा सुरु झाली आहे.(Jui Gadkari)
हे देखील पहा : ‘सायलीने शिकवला प्रियाला धडा’ प्रोमो पाहून चाहते सुखावले
तर जुईची ठरलं तर मग या मालिकेचं कथानक देखील रंजक आहे. सायली आणि अर्जुनाची जोडी प्रेक्षकांना आवडते. सायली आणि अर्जुन च्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मधल्या गंमतीजंमती प्रेक्षकांसाठी मनोरंजक असतात.तर सायली अगदी शांतपणे आणि हुशारीने प्रियाची प्रत्येक खेळी उधळून लावते.तिच्यातला संयम आणि शांतपणामुळे तिची भूमिका उठून दिसते.