मराठी मालिका विश्वात आघाडीला राहणं हे सहसा सगळ्याच मालिकांना जमत नाही. पण पदार्पणातच हे टायटल आपल्या नावावर करून घेतलंय ते म्हणजे भाग्य दिले तू मला या मालिकेने. मालिकेत बऱ्याचदा नायक आणि नायिका यांची प्रेम कहाणी जास्त हिट ठरते असं म्हणतात पण या मालिकेतील नायक नायिकेच्या प्रेम कहाणीसोबतच आई मुलाचं नातं, सासू सुनेचं नातं तसेच खलनायकी पात्र सगळ्यांनाच प्रेक्षकांची डोक्यावर घेतलेलं दिसतंय.(Sania plan against Kaveri)

मालिकेतील प्रमुख पात्र असलेली राज कावेरी बऱ्याच अडचणींना पार करून एकत्र आले. पण हेच सुख असं सुरु राहील तर कथा पुढे कशी सरकेल? म्हणून पुन्हा काही अडचणींना त्यांना समोर जावं लागलं. हटटाऊन गेलेला बिझनेस पण तरीही नात्यांमध्ये न आलेली फूट सांभाळत राज कावेरीने पुन्हा एकदा एक लहान बिझनेस सुरु केला. कावेरीने चहाचा नवीन धंदा सुरु केल्यावर राज देखील तिला मद्त करत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय. राज कावेरी यांच्या सोबतच रत्नमाला आणि बच्चू मामा देखील त्यांच्या या प्रयत्नात त्यांना मदत करताना दिसतायत.
नवीन बिझनेस छान सुरु असताना पुन्हा एकदा यांना त्रास देण्यासाठी सानिया वैदेही तयार झालेल्या दिसत आहेत. त्यात सानिया आणि वैदहीने त्यांची नवीन खेळी खेळ्याच समोर आलं आहे. काही माणसं येऊन कावेरीला सांगतात की आम्ही तुमची टपरी उचलायला आलो आहोत. त्या वर बच्चू मामा त्यांना विचारतात कि अशी कशी टपरी उचलाल तुम्ही. त्या वर ती माणसं त्यांना विचारतात कि काही परमिशन वैगरे घेतल्या होतात का ? तुमची टपरी इलीगल आहे असं सांगून ते त्यांच्या टपरीची नासधूस करतात.(Sania plan against Kaveri)

कावेरी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्त्न करते परंतु ते तीच काहीच ऐकून घेत नाहीत.सानिया आणि वैदेही हे सगळं बघून कावेरीची मज्जा घेत असतात. आता या नवीन संकटावर कावेरी कशी मात करेल, सानिया आणि वैदेहीची ही खेळी कशी उधळून लावेल हे बघणं रंजक ठरणार आहे.