“ठरलं तर मग” या मालिकेने कमी वेळातच प्रेक्षकांची माने जिंकली. ठरलं तर मग ही मालिका सध्या टीआरपी मध्ये नंबर वन स्थानकावर आहे. या मालिकेने आई कुठे काय तसेच रंग माझा वेगळा या दोन्ही मालिकांना मागे टाकले आहे. नुकताच या कार्यक्रमाचा नवीन प्रमो समोर आला आहे. (Tharla Tar Mag New Promo)
मालिकेत सुरु असलेल्या कथेनुसार अर्जुन आणि सायली यांचं काँट्रॅक नुसार एक वर्षासाठी लग्न झालं आहे. परंतु हे घरात कोणाला माहित नाही. या मालिकेतील प्रियाचं अर्जुनावर प्रेम असतं. सायली आणि अर्जुनचं लग्न झाल्यामुळे तन्वीच्या मनात सायली विषयी राग आहे. त्यामुळे ती काही ना काही कारस्थान करताना आपल्याला मालिकेमध्ये दिसते.

हे देखील वाचा: “चारचौघी मधील विद्या एकमेकांना भेटतात तेव्हा”,मुक्ताची वंदना गुप्तेंसाठी खास पोस्ट
मालिकेच्या नव्या प्रमोमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रिया सायलीच्या खोलीमध्ये तिला भेटायला जाते. तिच्याशी वाद घालते. परंतु सायली तिला बोलण्यात ऐकत नाही, त्यामुळे प्रिया स्वतःचे कपडे फाडते, स्वतःला मारून घेते आणि बाहेर जाऊन सगळ्यांना सांगते, की सायलीने मला मारले आहे. प्रियाचं हे सगळं नाटक पाहून सायली प्रियाची माफी मागण्याच नाटक करते आणि तिला पुन्हा खोलीत घेऊन जाते. (Tharla Tar Mag New Promo)
हे देखील वाचा: आयेशाच्या एन्ट्रीवर चाहत्यांनी व्यक्त केला संताप
आत गेल्यानंतर सायली तिला खरोखरच मारताना दाखवलं आहे. यानंतर आता अर्जुन घरी आल्यानंतर तो सायलीला म्हणतो तूच आता प्रियाला घराबाहेर काढ. हा प्रमो स्टार प्रवाह वाहिनी पेजच्या शेअर केला असून “त्या प्रियाला असचं पाहिजे दे तिला अजून चार” अशा चाहत्यांच्या कमेंट्स आल्या आहेत, तर हा प्रमो पाहून चाहते कमालीचे खुश झाल्याचं पाहायला मिळतंय.