शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : अडीच रुपयाचा वडापाव, तेच वर्ग अन्…; स्वतःच्या शाळेमध्ये पोहोचला सिद्धार्थ चांदेकर, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “डोळे भरुन आले आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 6, 2023 | 11:43 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Video : अडीच रुपयाचा वडापाव, तेच वर्ग अन्...; स्वतःच्या शाळेमध्ये पोहोचला सिद्धार्थ चांदेकर, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, "डोळे भरुन आले आणि..."

jhimma 2 fame actor siddharth chandekar and kshiti jog visit to their school in pune video shared on instagram

सध्या सर्वत्र ‘झिम्मा २’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. नुकताच प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करत असून प्रेक्षकांचेही चांगलेच मनोरंजन करत आहे . अनेक चित्रपटगृहांबाहेर या चित्रपटाला ‘हाऊसफूल’चे बोर्डही लागत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमत्ताने कलाकार अनेक ठिकाणी भेटी देत आहेत. प्रेक्षकांचा उत्साह वाढवण्यासाठी कलाकार चित्रपटगृहात जाऊन चाहत्यांना भेटत आहेत. अशातच हे कलाकार पुण्याला काही ठिकाणी भेटी देण्यासाठी गेले होते. तेव्हा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व अभिनेत्री क्षिती जोग हे त्यांच्या पुण्यातील शाळेत गेले होते आणि यानिमित्ताने त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. (Actor Siddharth Chandekar On Instagram)

सिद्धार्थ व क्षिती या दोघांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर करत त्यांच्या बालपणीच्या जुन्या आठवणी चाहत्यांबरोबर शेअर केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी ‘सेठ दगडूराम कटारिया इंग्लिश मिडियम हायस्कूल’ शाळेला भेट दिल्याचे दिसत आहे. ज्या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले आहे. या दोन्ही कलाकारांनी शाळेचा वर्ग, आजूबाजूचा परिसर, मैदान त्याचबरोबर शाळेच्या उपहारगृहात फेरफटका मारत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)

आणखी वाचा – ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात उपेंद्र लिमये यांची भूमिका गुपित ठेवण्याबाबत स्वतःच केला खुलासा, म्हणाले, “मी माध्यमांपासून…”

हा खास व्हिडीओ शेअर करत त्याने या व्हिडीओखाली कॅप्शनमध्ये असं लिहिल आहे की, “आयुष्यातील पराभव व विजयाचं महत्त्व जाणून घेण्यासाठी आपण इथे पुन्हा जाऊ शकतो का? त्यावेळच्या जुन्या गोष्टी आता पुन्हा आठवल्या की, डोळे भरून आल्याशिवाय राहत नाहीत.” त्याचबरोबर या व्हिडीओद्वारे त्याने “आपण जर त्या जुन्या आठवणींमध्ये पुन्हा जाऊ शकतो? ते चिंतामुक्त आयुष्य आपण पुन्हा केव्हा जगू शकतो? एकत्र डब्यातलं जेवण जेवायचं किंवा अडीच रुपयांचा गरमागरम वडापाव खायचा. या सगळ्या गोष्टी आठवल्यावर चेहऱ्यावर आपसूकच हसू येतं.” असंही म्हटलं आहे.

आणखी वाचा – ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात उपेंद्र लिमयेंना करायचं नव्हतं काम, अभिनेत्याचा पहिल्यांदाच मोठा खुलासा, म्हणाले, “नकार दिला आणि….”

या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये त्याच्या अनेक चाहत्यांनी व काही कलाकारांनीही आम्ही त्या शाळेचे विद्यार्थी असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर त्या जुन्या दिवसांची पुन्हा एकदा सफर करुन आणल्याबद्दल त्याचे कौतुक व त्याला धन्यवाददेखील म्हटले आहे. दरम्यान, त्यांच्या ‘झिम्मा २’ या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तसेच सिद्धार्थ व क्षिती यांच्या ‘कबीर’ व ‘मिता’ या पात्रांसह चित्रपटातील इतर कलाकारांनादेखील भरपूर प्रेम मिळत आहे.  

Tags: entertainmentjhimma 2kshitee jogmarathi entertainmentmarathi movieMarathi newssiddharth chandekar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Priyanka Chopra Deepfake Video

रश्मिका मंदाना, कतरिना कैफ पाठोपाठ प्रियांका चोप्राही डीपफेक व्हिडीओची बळी, यावेळी चेहऱ्याशी छेडछाड नाही तर…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.