शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रश्मिका मंदाना, कतरिना कैफ पाठोपाठ प्रियांका चोप्राही डीपफेक व्हिडीओची बळी, यावेळी चेहऱ्याशी छेडछाड नाही तर…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 6, 2023 | 12:01 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Priyanka Chopra Deepfake Video

रश्मिका मंदाना, कतरिना कैफ पाठोपाठ प्रियांका चोप्राही डीपफेक व्हिडीओची बळी, यावेळी चेहऱ्याशी छेडछाड नाही तर...

सोशल मीडियाचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत. प्रगत तंत्रज्ञान एकप्रकारे लोकांच्या जीवनात येत आहे, पण त्याचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात होतं असल्याचं पाहायला मिळत आहे. एखाद्याचा आवाज वा फोटो मॉर्फ करण्यासाठी अनेक लोक कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI)चा गैरवापर करताना दिसत आहेत. अशातच सिनेसृष्टीतील काही कलाकार मंडळीही या डीपफेक व्हिडीओचे शिकार झाले आहेत. काही दिवसांपासून या कलाकारांच्या डीपफेक व्हिडीओने अक्षरशः धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे. (Priyanka Chopra Deepfake Video)

रश्मिका मंदान्ना ते आलिया भट्ट, कतरिना कैफ, काजोल यांसारखे मोठे स्टार डीपफेक व्हिडिओचे बळी ठरले आहेत. यानंतर आता अभिनेत्री प्रियंका चोप्रा देखील डीपफेक व्हिडिओची शिकार झाली आहे. नुकताच तिचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती एका ब्रँडची जाहिरात करताना दिसत आहे. एका ब्रँडची जाहिरात करत असताना तिच्या या मुलाखतीचा हा मॉर्फ केलेला व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार करण्यात आला आहे.

आणखी वाचा – ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटातील प्रसाद ओकच्या फर्स्ट लूकने वेधलं लक्ष; गौरव मोरेची भूमिका पाहता प्रेक्षकही भारावले, व्हिडीओ पाहिलात का?

प्रियांका चोप्राचा डीपफेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र प्रियांकाच्या या व्हिडिओमध्ये इतर अभिनेत्रींप्रमाणे प्रियांकाचा चेहरा बदललेला नसून तिच्या आवाजाशी छेडछाड करण्यात आली आहे. अभिनेत्रीच्या तोंडून वेगळंच बोलणं ऐकू येत आहे, हे सर्व एआयच्या मदतीने करण्यात आलं आहे. तिचा आवाज तसेच तिचे संवाद या बनावट ब्रँडच्या जाहिरातींसाठी बदलल्या आहेत. या बनावट क्लिपमध्ये प्रियांका तिची वार्षिक कमाई उघड करण्याबरोबरच एका ब्रँडची जाहिरात करताना दिसत आहे.

आणखी वाचा – ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात उपेंद्र लिमये यांची भूमिका गुपित ठेवण्याबाबत स्वतःच केला खुलासा, म्हणाले, “मी माध्यमांपासून…”

व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा म्हणत आहे, ‘सर्वांना नमस्कार, माझे नाव प्रियांका चोप्रा. मी एक मॉडेल, अभिनेत्री व गायक आहे. २०२३ मध्ये मी १ हजार लाख रुपये कमावले आहेत. चित्रपट, गाण्यांव्यतिरिक्त मी इतर गुंतवणूक प्रकल्पांमध्येही योगदान दिले आहे. मी माझी मैत्रीण रुची भल्ला हिला हा प्रकल्प सुचवू इच्छिते. तुम्ही दर आठवड्याला ३ लाख रुपये कमवू शकता. यासाठी तुम्हाला त्याचे टेलिग्राम चॅनल फॉलो व सबस्क्राईब करण्याची गरज नाही” असं बोलतानाचा प्रियांकाचा हा व्हिडीओ समोर आला आहे.

Tags: bollywood actressentertainmentpriyanka chopraPriyanka Chopra DeepfakePriyanka Chopra Deepfake Video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
upendra limaye told about his family reaction

"बाबा, बाबा म्हणत…", ‘अ‍ॅनिमल’नंतर उपेंद्र लिमयेंच्या मुलांचीही मान उंचावली, कुटुंबाबाबत पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले, "मुलाची रशियामधील मैत्रीण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.