छोट्या पडद्यावरील ‘झलक दिखला जा ११’ हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. गेले ३ महीने या शोने प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आता हा शो अंतिम टप्प्यात आला आहे. याशोमधील शोएब ईब्राहीम, मनीषा राणी व अद्रिजा सिन्हा यांनी टॉप ३ मध्ये आपले स्थान मिळवले आहे. पण काही मीडिया रिपोर्टनुसार, या शोमधील मनीषा राणीने ‘झलक दिखला जा ११’ची ट्रॉफी जिंकल्याचे बोलले जात आहे.
मनीषा राणीने या शोमध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला होता. शोच्या मध्यात येऊनही मनीषाने आपल्या कौशल्याने व नृत्याने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या प्रेमामुळे व तिच्या मेहनतीने मनीषाने हा शो जिंकला असल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मनीषा हातात ट्रॉफी धरताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे मनीषाने हा शो जिंकला असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, या सगळ्यात किती तथ्य आहे? यासाठी महाअंतिम सोहळा पहावा लागेल.
‘झलक दिखला जा ११’ मध्ये मनीषा राणीने केवळ प्रेक्षकांनाच नाही तर फराह खान, मलायका अरोरा खान आणि अर्शद वारसी या परीक्षकांना ही तिच्या नृत्याने प्रभावित केले आहे. या महाअंतिम सोहळ्याच्या खास भागामध्ये अभिनेत्री सारा अली खान, विजय वर्मा, हुमा कुरेशी तसेच अन्य काही बॉलिवूड कलकारही सहभागी होणार आहेत.
आणखी वाचा – Meraj Zaidi Death : प्रसिद्ध लेखक मेराज जैदी यांचे निधन, वयाच्या ७६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दरम्यान, काही मीडिया रिपोर्टसनुसार, ‘झलक दिखला जा ११’चा महाअंतिम सोहळ्याचे शूटिंग झाले आहे. तसेच येत्या २ मार्च रोजी ‘झलक दिखला जा ११’ चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे अनेक चाहते या ‘झलक दिखला जा ११’च्या महाअंतिम सोहळ्याची वाट पाहत आहेत.