मनोरंजन क्षेत्रामध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. एकामागोमाग एक असे अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. त्यातच आता ‘ईश्कबाज’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली सुरभि चंदना ही तिचा प्रियकर करण शर्माबरोबर लग्न करणार आहे. नुकतेच तिने तिच्या मैत्रिणींबरोबर लग्नाआधीची पार्टी केली त्याचे फोटो तिने स्वतःच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. २ मार्च रोजी जयपूर येथे त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. (actress Surbhi Chandna Wedding)
शुक्रवारी सुरभि व करणच्या लग्नाआधीच्या विधींना सुरवात झाली आहे. जयपूरमधील चोमू जिल्ह्यातील चोमू पॅलेस हॉटेलमध्ये विवाहसोहळा पार पडणार आहे. हा तो पॅलेस आहे ज्यामध्ये २००७ साली अभिनेता अक्षय कुमारच्या ‘भूलभुलय्या’ चित्रपटाचे चित्रिकरण करण्यात आले होते. त्याच ठिकाणी सुरभिचा विवाहसोहळा होणार आहे. गुरुवारी सुरभि तिच्या नातेवाईकांसह जयपूर येथे पोहोचली. त्यांचे गळ्यात फुलांच्या माळा घालून आणि कपाळावर टिका लाऊन जंगी स्वागत करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
आणखी वाचा – अक्षय कुमार लवकरच राजकारणामध्ये प्रवेश करणार?, भाजपाकडून निवडणूक लढणार असल्याची शक्यता
लग्नापूर्वीच्या विधींना आज सुरवात झाली असून मेहंदीचा कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमाचे फोटोही समोर आले आहेत. दोघांनीही या कार्यक्रमासाठी रॉयल एंट्री घेतली. यावेळी सुरभिने हिरव्या रंगाचा लेहंगा परिधान केला असून कानामध्ये झुमके आणि नाकात नथ घातली आहे.सुरभिचा हा हटके लूक सर्वांनाच आवडला. तसेच करणनेदेखील हिरव्या रंगाची शेरवाणी घातली असून दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.
आणखी वाचा – ‘झलक दिखला जा ११’ शोचा ‘हा’ स्पर्धक ठरणार विजेता, महाअंतिम सोहळ्यापूर्वीच नाव समोर
‘ईश्कबाज’चे सर्व सह-कलाकार सुरभिच्या लग्नासाठी खूप उत्सुक आहेत. अभिनेत्री मानसी श्रीवास्तवने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा पती, श्रेणु पारेख,कुणाल जयसिंह व त्यांच्या इतर मित्र-मैत्रिणीबरोबरचा मजा-मस्ती करतानाचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये लिहिले आहे की, “नवरा-नवरीच्या लग्नात मजा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. तुम्ही दोघं मेहंदी लाऊन बसा”. मिळालेल्या माहितीनुसार, सुरभि व करण हे दोघेही आधी खूप चांगले मित्र होते. नंतर दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि १३ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.