अनेक मालिका चित्रपटातून अभिनेता विकास पाटील प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. परंतु बिग बॉस मराठी सीजन तीनमुळे विकासाला खास ओळख मिळाली. तेव्हा पासून विकास प्रकर्षाने प्रेक्षकांच्या नजरेत आला. त्याची आणि विशालची जोडी जय-वीरूच्या नावाने गाजली,बिग बॉसच्या घराच्या बाहेर आल्यानंतर देखील त्यांची मैत्री टिकून आहे त्यामुळे प्रेक्षक कायमच त्यांचं कौतुक करतात.
सध्या विकास स्टार प्रवाह वरील सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेत पाहायला मिळाला. शालिनीचा भाऊ राहुल ही भूमिका विकासने साकारली. त्याच्या या भूमिकेला देखील चांगला प्रतिसाद मिळाला.नायक, खलनायक, सहायक अभिनेता अशा वेगवेगळ्या भूमिकेत विकास पाहायला मिळतो. चार दिवस सासूचे, कुलवधू, लेक माझी लाडाची अशा अनेक मालिकांमधून तो बरच काळ प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे.(Vikas Patil New Serial)
पाहा कोण साकारणार आहे स्वामीसुतांची एंट्री (Vikas Patil New Serial)
कलर्स मराठी वरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच पाचशे भागांचा टप्पा पार केला. आध्यत्मिक मालिकांची सध्या चलती आहे. मोठ्या काळापर्यंत या मालिका तग धरून आहेत.प्रेक्षक देखील या मालिकांना चांगला प्रतिसाद देत आहेत. (Vikas Patil New Serial)
हे देखील वाचा – एयरपोर्टवर चाहतीने व्यक्त केलं ‘बी टाऊन’ फेम तमन्ना भाटिया वरचं प्रेम
जय जय स्वामी समर्थ या मालिकेत आता अभिनेता विकास पाटील याची नवीन एन्ट्री होणार आहे. स्वामीसूत हे पात्र विकास पाटील साकारणार असल्याची माहिती त्यानी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर फोटो शेअर करून दिली आहे.विकासाला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
