Ira Khan Birthday Wish : आमिर खानची मुलगी आयरा खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच आयराने तिचा पती नुपूर शिखरेला त्याच्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. तिने तिच्या पतीसाठी एक खास पोस्ट शेअर केली असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. आयरा खानने पोस्ट करत असे म्हटलं आहे की, “तू माझ्या आयुष्यातील सर्वात आवडती गोष्ट आहेस. निर्णय व अनुभव सर्वकाही तू आहेस. तू मला हसवतोस, तू मला धरुन ठेवतोस, तू मला समजावतोस”.
पुढे ती म्हणाली की, “काळजी म्हणजे काय याची तू मला आठवण करुन देतोस आणि तू अशी जागा तयार करतोस जिथे मी निश्चिंतपणे जगू शकेन. हे मनाला खूप भावणारे आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या प्रिय”, असं तिने म्हटलं आहे. आयराने पुढे लिहिले, “मला आशा आहे की तुझे सर्व दिवस तुम्हाला हवे तसे सामान्य असतील. काही अतिरिक्त स्मरणपत्रे आणि तुमच्यावर किती प्रेम व कौतुक आहे याची जाणीव देखील तुला होईल. अनुभवी श्रेणीच्या आणखी एक वर्ष जवळ आपण जात आहोत”, असं देखील आयरा म्हणाली.
आयराने खास कॅप्शनसह अनेक फोटोही शेअर केले आहेत. यामध्ये ती आपल्या पतीबरोबर खास वेळ घालवताना दिसत आहे. आयरा व नुपूरने दोनदा लग्न केल्याची माहिती आहे. यापूर्वी त्यांनी ३ जानेवारी २०२४ रोजी कोर्ट मॅरेज केले होते. यानंतर त्यांनी १० जानेवारी २०२४ रोजी उदयपूरमध्ये ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. आयरा व नुपूरच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. जॉगिंग करताना नुपूर त्यांच्या लग्नाच्या वरातीत पोहोचला.
आणखी वाचा – सलमान खानला दिली Y Plus सुरक्षा, ‘या’ सुरक्षेसाठी सरकार किती कोटी रुपये खर्च करणार?, रक्कम ऐकून व्हाल थक्क
यावेळी त्याने बनियान व चड्डी घातली होती. आयरा व नुपूर बऱ्याच दिवसांपासून एकत्र आहेत. चाहत्यांना त्यांची जोडी खूप आवडते. दोघांचेही एक खास बंध आहे. वर्क फ्रंटवर, आमिर खानची मुलगी असल्याने, आयराने बॉलिवूडपासून अंतर ठेवले आहे. नुपूर शिखरे हा एक प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर आहे.