झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका आहे. रहस्यमय कथानकामुळे ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांची आवडती मालिका होत आहे. मालिकेत नेहमीच नवनवीन ट्विस्ट येत असतात. मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. मालिकेच्या आगळ्या वेगळ्या कथानकाने व कलाकारांच्या उत्तम अभिनयाने ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. अशातच आता मालिकेत आणखी एक मोठे वळण आले असून नुकताच या ट्विस्टचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. (Satvya Mulichi Satavi Mulgi updates)
झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे नुकताच सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे आणि या नवीन प्रोमोमधून मालिकेत एका नवीन पात्राची एन्ट्री झाल्याची पाहायला मिळत आहे आणि हे नवीन पात्र म्हणजे केतकीचा नवरा. मालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून केतकीचा नवरा केदार हा गायब होता. मात्र आता त्याची या कुटुंबात एन्ट्री झाली आहे. केदारच्या या एन्ट्रीचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून या प्रोमोखाली ‘राजाध्यक्षांच्या घरापासून दूर गेलेली ‘ती’ व्यक्ती घरी परतणार’ असं म्हटलं आहे.
या नवीन प्रोमोमध्ये नेत्रा असं म्हणते की, “घरातील स्त्रिया एकत्र असल्या की घरातील चैतन्य टिकून असते”. यावर इंद्राणी तिला उत्तर देत असं म्हणते की, “काळजी करु नकोस, या घरापासून गेलेली प्रत्येक व्यक्ती घराकडे परत येणार. घरापासून लांब गेलेली पाऊले पुन्हा घराकडे येतील”. इतक्यात दरवाजा ठोठावण्याचा आवाज येतो आणि दारात केदार उभा असतो. केदारला पाहून केतकीला अश्रू अनावर होतात. पण घरातील सर्वांना मोठा धक्का बसतो. मालिकेचा हा नवीन प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओखाली कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
आणखी वाचा – Video : मावशी झाल्याचे कळताच तितीक्षाला रडू आवरेना, थेट हॉस्पिटलला जात भेट घेतली अन्,…; व्हिडीओ समोर
दरम्यान, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत काही दिवसांपूर्वी मोठा ट्विस्ट आला होता. मालिकेने सात वर्षांची लीप घेतली. सात वर्षांनंतर ईशा-रीमा (नेत्राच्या मुली) मोठ्या झाल्या आहेत. पण राजाध्यक्ष कुटुंबात नेत्राला वाटणारं सुख हे खरंतर वरवरचा देखावा असून घर दुभंगलं जातं. नेत्रा मैथिलीचं सगळं करण्यात आणि मुलींच्या संगोपनात गर्क होते. यानंतर राजाध्यक्षांच्या घरातील स्त्रिया एकत्र आल्या आहेत आणि यात केदारचीही भर पडली आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागासाठी प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.