Salman khan Given Y Plus Security Expenditure : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान बिष्णोई समाजाचं पुढील टार्गेट असल्याचं समोर आलं आहे. यामुळे काल अभिनेत्याची सुरक्षा एका थराने वाढवण्यात आली असल्याचं समोर आलं. सलमान खानच्या सुरक्षेवर सरकार दर महिन्याला किती पैसा खर्च करतंय आणि वर्षाला किती खर्च करतंय याचा हिशोब धक्कादायक आहे.
वाय प्लस सिक्युरिटी म्हणजेच जवळपास २५ सुरक्षा कर्मचारी सलमान खानच्या सुरक्षेत असतील. ज्यामध्ये सुमारे 2 ते 4 NSG कमांडो आणि पोलिस सुरक्षा कर्मचारी म्हणजेच सुमारे २५ सुरक्षा कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतात. या सुरक्षा दलाकडे २ ते ३ वाहने आहेत. तज्ज्ञांच्या मते, Y Plus सुरक्षेवर दरमहा सुमारे १२ लाख रुपये खर्च होतो, म्हणजेच वार्षिक खर्च सुमारे १.५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचतो. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही वाय प्लस सिक्युरिटी टीमसह उपस्थित असलेल्या लोकांची संख्या सुरक्षेच्या कारणास्तव स्पष्टपणे सांगता येणार नाही.
तज्ज्ञांच्या मते, सध्या सलमान खानच्या सुरक्षेवर करोडोंचा खर्च आहे. वाय प्लस सुरक्षा, मुंबई पोलिस कर्मचारी तैनात, सलमान खानचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक, सलमानच्या सुरक्षेवरील एकूण वार्षिक खर्च सुमारे ३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकी मिळाल्यानंतर आणि त्याच्या घरावर गोळीबार करण्यात आला तेव्हापासून मुंबई पोलिसांनी त्याची सुरक्षा वाढवली आहे. सिव्हिल वेशातील मुंबई पोलिस कर्मचारीही त्यांच्या घराजवळ हजर आहेत.
आणखी वाचा – तिसऱ्या मजल्यावरुन पडून सुप्रसिद्ध गायकाचा मृत्यू, वयाच्या ३१ व्या वर्षी निधन, कारणही आले समोर
मात्र सध्याच्या परिस्थितीत ज्या दिवसापासून सलमान खानचा खास मित्र मानल्या जाणाऱ्या बाबा सिद्दिकीची हत्या झाली आणि त्यामागे लॉरेन्स गँगचा हात असल्याचे समोर आलं तेव्हापासून मुंबई पोलीस सुपरस्टारच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क झाले आहेत. यावरुन सलमान खानचा भाऊ अरबाजनेही भाष्य केलं. अरबाज खान म्हणाला, “आम्ही ठीक आहोत. मी असे म्हणणार नाही की आम्ही पूर्णपणे ठीक आहोत, कारण सध्या कुटुंबात बरेच काही चालू आहे. पूर्णपणे प्रत्येकजण काळजीत आहे”.