इंटरनेटच्या जगात ‘ऑरी’ला ओळखणार नाहीत असे लोक अगदीच बोटावर मोजण्याइतके मिळतील. तो सतत बॉलिवूड कलाकारांबरोबर अनेक पार्टीमध्ये जाताना दिसतो. तो पार्टीमध्ये त्याच्या विशेष पोजमध्ये फोटो काढण्याचे २० ते २५ लाख रुपये घेतो असे त्याने एकदा सलमान खानच्या कार्यक्रमात सांगितले होते. त्यावर तो नक्की काय करतो आणि कीती पैसे कमावतो अशा सर्व चर्चाना उधाण आले होते. अशातच आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने एका कंटेंट क्रिएटरच्या विरोधात कायदेशीर नोटिस जारी केली आहे. (orry on infulencer video)
एका कार्यक्रमाप्रसंगी बॉलिवूड कलाकार तसेच इंफ्लूएंसर्स उपस्थित होते. त्यावेळी रुचिका लोहिया या कंटेंट क्रिएटरने ऑरीच्या वर्तनामुळे दु:खी झाल्याने एक व्हिडीओ शेअर केला होता . ज्यामध्ये तिने ऑरीच्या वर्तनाबद्दल भाष्य केले आहे. तिचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तिने सांगितले की, “ऑरीशी हातमिळवणी करण्यासाठी गेले असता त्याने सर्वांसमोर मला टाळले. त्यामुळे सर्वांसमोर मला शरमेने मान खाली घालावी लागली”.
हा व्हिडीओ तिने दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर आपलोड केला होता. या व्हिडीओला आतापर्यंत तब्बल ३.९ मिलियन लोकांनी पाहिला आहे. एका कार्यक्रमामध्ये तिने ऑरीची भेट घेतली आणि त्याचे कौतुकही केले. ऑरीनेदेखील तिच्याबरोबर संवाद साधला होता. पण ऑरीच्या मॅनेजरने फोटो घेण्यासाठी नकार दिला. त्यानंतर जाताना तिने त्याच्याबरोबर हात मिळवण्यासाठी हात पुढे केला. पण ऑरीनेने हात मिळवण्यासाठी नकार दिला. त्यामुळे रुचिकाला सर्वांसमोर शरमेने मान खाली घालावी लागली.
तिने आपल्या व्हिडीओमध्ये सांगितले आहे की ‘तो मला हातही लाऊ शकला नाही’. हा व्हिडीओ पाहताच ऑरीने प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये त्याने लिहिले आहे की, “मी तिच्याबरोबर हात मिळवण्यासाठी यासाठी नाही म्हंटलं कारण तिच्या हातावर किटाणू असण्याची शक्यता असू शकते. मला माझ्या चाहत्यांना व मित्रांना भेटण्यासाठी नेहमी आनंद होतो. पण सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून मला भेटायला येणे, माझी सिक्युरिटी तोडणे तसेच माझ्या मॅनेजरचा आदर न करणे हे तू केलंस तरीही मी तुझे खूप आदराने स्वागत केले. अनोळखी व्यक्तीबरोबर मी हात मिळवेन अशी आशा तुम्ही ठेवू नका. तुझ्याशी मी आदराने व आनंदाने बोललो हे तुझ्यासाठी पुरेसं नव्हतं का?”
तसेच त्याने यासंदर्भात बदनाम केले म्हणून रुचिकाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची धमकीदेखील दिली आहे. त्याने लिहिले आहे की, “मी लगेच मानहानीचा दावा दाखल करणार आहे. याबद्दल मी माझ्या लीगल टीमला सांगितले आहे. या सर्व प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेजदेखील मागवण्यात आले आहेत”.
दरम्यान या प्रकरणावर ऑरीने खूप टोकाची भूमिका घेतली असल्याचे अनेकांनी म्हंटलं आहे. आता रुचिकावर कायदेशीर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.