बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पहिली भेट, कुटुंबियांकडून होकार अन्…; अशी सुरु झाली होती कार्तिकी गायकवाडची लव्हस्टोरी, मुग्धा-प्रथमेश, आर्यालाही ऐन मोक्यावर लग्नाचं सांगितलं तेव्हा…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 29, 2024 | 3:44 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kartiki Gaikwad Lovestory

पहिली भेट, कुटुंबियांकडून होकार अन्…; अशी सुरु झाली होती कार्तिकी गायकवाडची लव्हस्टोरी, मुग्धा-प्रथमेश, आर्यालाही ऐन मोक्यावर लग्नाचं सांगितलं तेव्हा…

‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून गायिका कार्तिकी गायकवाड घराघरांत पोहोचली. कार्तिकीने आजवर तिच्या गायनशैलीने रसिक प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. जगभरात कार्तिकीचे बरेच चाहते आहेत. सोशल मीडियावरही कार्तिकी बऱ्यापैकी सक्रिय असते. बरेचदा गायिका तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अशातच आता कार्तिकी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. कार्तिकी लवकरच चाहत्यांना गुडन्यूज देणार आहे. कार्तिकीच्या समोर आलेल्या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Kartiki Gaikwad Lovestory)

कार्तिकी व रोनित लवकरच आई-बाबा होणार आहेत. कार्तिकीच्या डोहाळ जेवणातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. अगदी राजेशाही थाटामाटात कार्तिकीचा हा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पार पडला आहे. लग्नाच्या चार वर्षांनी कार्तिकी आई होणार आहे. ही कार्तिकीने दिलेली आनंदाची बातमी साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. कार्तिकीने २०२०मध्ये रोनित पिसेसह लग्नगाठ बांधली.

आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडचा नवरा आहे मोठा उद्योजक, तो नेमकं काय काम करतो?, रोनितला करण्यात आलं होतं सन्मानित कारण…

View this post on Instagram

A post shared by Kartiki Kalyanji Gaikwad – Pise (@kartiki_kalyanji_gaikwad9)

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत कार्तिकीने तिच्या लग्नाबाबत भाष्य केलं होतं. तेव्हा कार्तिकी म्हणाली, “आम्ही डिसेंबरमध्ये लग्न करायचे ठरवले होते. जेणेकरुन कोरोनाच प्रमाण कमी होईल किंवा किमान नियंत्रणात येईल. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे आम्हाला सावध राहावे लागले. शिवाय, आमची लग्नाची तारीख पुढे ढकलण्याचा आमचा हेतूही नव्हता. त्यामुळे आम्ही सर्व प्री-फंक्शन्स हे सामाजिक अंतराचे नियम काटेकोरपणे पाळले जातील याची आम्ही खात्री करून घेत लग्नसोहळा उरकला”.

आणखी वाचा – खास रांगोळी, स्पेशल लूक, दागिने अन्…; डोहाळे जेवणासाठी कार्तिकी गायकवाडचा राजेशाही थाट, कुटुंबियांचाही आनंद गगनात मावेना

गायिका पुढे म्हणाली, “आमचा विवाह घरच्यांनी जुळवून आणला आहे. आमच्या घरीच आम्ही आमच्या संबंधित कुटुंबांद्वारे भेटलो. रोनित एक अद्भुत व्यक्ती आहे आणि तो पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे.” यावरुन कार्तिकी व रोनित यांचं अरेंज मॅरेज असल्याचं कळतंय. सध्या दोघांचा सुखाचा संसार सुरु असून कार्तिकी व रोनित लवकरच चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी करताना दिसत आहेत.

कार्तिकीच्या लग्नाबाबत मुग्धा, प्रथमेश व आर्या यांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. होम मिनिस्टर कार्यक्रमात कार्तिकी व रोनित यांनी हजेरी लावली होती तेव्हा त्यांच्या मित्र परिवारालाही आमंत्रित करण्यात आलं होत. यावेळी कार्तिकीच्या लग्नाबाबत बोलताना मुग्धा म्हणाली, “तिने जेव्हा मला फोन करुन सांगितलं तेव्हा मला धक्काच बसला. याआधी कधी आम्ही लग्नाबाबत बोलायचो तेव्हा तिचं एकटीच असं म्हणणं असायचं की आम्ही कधीच लग्न करणार नाही. फोन आल्यावर मला आधी तेच आठवलं की, ही लग्न करणार नव्हती”.

Tags: entertainmentkartiki gaikwadKartiki Gaikwad and ronit piseKartiki Gaikwad Lovestory
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Gautami Deshpande And Swanand Tendulkar

बायको असावी तर अशी! गौतमी देशपांडेने नवऱ्याला गिफ्ट केले चक्क सहा घड्याळ, स्वानंदला काय बोलावं सुचेना, म्हणाला, "बायको जेव्हा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.