भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. त्याच्या खेळाची जगभरात चर्चा होतेच मात्र सध्या तो खासगी आयुष्यामुळे अधिक प्रकाशझोतात आला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक बरोबर घटस्फोट घेणार असल्याचे बोलले जात होते. मात्र खूप काळ दोघांनीही यावर कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नव्हते. मात्र काही दिवसांपूर्वी स्वतः हार्दिकने नताशापासून वेगळे होणार असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. त्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. वेगळे झालो तरीही मुलासाठी आम्ही वेळ देऊ हेदेखील त्याने स्पष्ट केले होते. (hardik pandya dating)
हार्दिकने वेगळे होणार असल्याचे जाहीर करताच नताशा मायदेशी परतली. तिने अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले होते. तसेच आता ती आपले नाव बदलणार असा अंदाजही चाहत्यांनी मांडला. तसेच काही दिवसांपूर्वी हार्दिकचा एका मुलीबरोबरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे ती मुलगी नक्की कोण? असा प्रश्नदेखील सगळ्यांना पडला होता. मात्र हार्दिक किंवा त्याच्या कुटुंबीयांनी यावर कोणतेही भाष्य केले नव्हते. अशातच आता पुन्हा एकदा त्याचे एका बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर नाव जोडले जात आहे.
नताशाबरोबर घटस्फोट झाल्यानंतर हार्दिक आता ब्रिटिश गायिका व अभिनेत्री जॅस्मिन वालियाला डेट करत असल्याचे अंदाज बांधला जात आहे. सध्या दोघंही एकत्रित सुट्ट्यांचा आनंददेखील घेत आहे. दोघेही ग्रीसमध्ये असून दोघांचे वेगवेगळे फोटो समोर आले आहेत. एक दिवस आधी हार्दिकने त्याचे एकट्याचे फोटो शेअर केले होते तर जॅस्मिननेदेखील तिचे फोटो शेअर केले आहेत. वेगवेगळे फोटो असले तरीही ठिकाण एकच दिसत असल्याने हे अंदाज नेटकरी बांधत आहेत.
यावेळी हार्दिकने स्विमिंग पूलच्या बाजूला बाजूला उभे राहून फोटोशूट केले आहे. यामध्ये त्याने काळ्या रंगाचा शर्ट व फिकट पांढऱ्या रंगाची पॅंट परिधान केली आहे तर जॅस्मिननेदेखील याचठिकाणी बिकिनीमध्ये फोटोशूट केले होते.जॅस्मिनच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर हिंदी चित्रपट सोनू की टिट्टू की स्विटी’मधील ‘बॉम डिगी डिगी’ या गाण्यामुळे अधिक प्रकाशझोतात आली होती. तसेच या व्यतिरिक्त ती सोशल मीडियावरदेखील अधिक सक्रिय असते.