Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व चांगलेच गाजताना दिसत आहे. ‘भाऊचा धक्का’ या एपिसोडनंतर तिसऱ्या आठवड्याची सुरुवात निक्की तांबोळीच्या भांडणाने झालेली पाहायला मिळाली आहे. तिने इतर सदस्यांचे कपडे फेकत धक्काबुक्की केल्याचे पाहायला मिळाले होते. ‘बिग बॉस’च्या घरात दररोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आता ‘कलर्स मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला असून या प्रोमोमधून ‘बिग बॉस’च्या घरात आता दुसऱ्या कॅप्टन पदासाठी लढत होणार आहे. कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये घरातील सदस्य कॅप्टन पदासाठी एमकमेकांच्या विरुद्ध उभे राहणार आहेत. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
नुकत्याच आलेल्या या नवीन प्रोमोमध्ये कॅप्टन पद मिळवण्यासाठी घरातील सदस्यांना बोटीत बसून मोती शोधायचे आहेत आणि कॅप्टन पदाचे उमेदवार बाजूला करायचे आहेत. त्यामुळे घरातील सर्व सदस्य बोटीतून मोती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून त्यांना कॅप्टन पदासाठीचा योग्य उमेदवार मिळेल. दरम्यान, या प्रोमोमध्ये निक्की अरबाज यांची टीम व अंकिता वर्षा, योगिता यांची टीम खूपच मेहनत करताना दिसून येत आहे. तसंच या व्हिडीओमध्ये घरातील सर्व सदस्यांची एकमेकांशी धक्काबुक्कीही होतानाचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – Bigg Boss ची गुगली, नॉमिनेशन कार्यात आणला मोठा ट्विस्ट, या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार?
प्रोमोमध्ये पुढे अरबाजकडून अभिजीतला धक्कादेखील लागतानाचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता कोणता स्पर्धक या कॅप्टन पदासाठीच्या बोटीत बसणार? आणि कोण या घराचा दूसरा कॅप्टन बनणार? हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसंच या कॅप्टन पद मिळवण्यासाठीचा कल्लादेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या कॅप्टन पदाचा बहुमान मिळवण्याची संधी अंकिता वालावलकरला मिळाली होती. त्यानंतर आता या घराचा दूसरा कॅप्टन कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आणखी वाचा – “बाबा तुमची आठवण येतेय”, विलासराव देशमुखांच्या स्मृतीदिनानिमित्त रितेश-जिनिलीया भावुक, फोटोही केले शेअर
दरम्यान, पहिल्या कॅप्टन्सी टास्कवरुन घरात खूप राडे झाले होते. वर्षा यांच्या पक्षपातीपणामुळे अंकिता कॅप्टन झाल्याचा आरोप निक्की व जान्हवी यांनी केला होता. त्यामुळे आता निक्की व तिची टीम या दुसऱ्या कॅप्टन पदासाठीच्या टास्कमध्ये बाजी मारणार का? अरबाज व वैभव यांच्या मदतीने हा कॅप्टन्सीचा टास्क जिंकणार का? हे प्रेक्षकांना आज पाहायला मिळणार आहे.