शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : निक्की-अरबाजने मालवणी भाषेला मराठी भाषा नाही म्हणताच प्रेक्षकांचा राग अनावर, म्हणाले, “स्वतः नीट बोलत नाही आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 14, 2024 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5

'बिग बॉस मराठी'मधील मालवणी भाषेतील वाद चिघळला

Bigg Boss Marathi 5 :  ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५च्या घरात स्पर्धकांना एक टास्क देण्यात आला होता. या टास्कमध्ये दोन नवीन पाहुणे ‘बिग बॉस’च्या घरात दाखल झाले होते. या दोन नव्या पाहुण्यांची विशेष काळजी घेण्याची जबाबदारी ‘बिग बॉस’ यांनी स्पर्धकांवर सोपवली होती. मात्र या टास्कदरम्यान स्पर्धकांना एक अट घालण्यात आली होती की हे दोन्ही पाहुणे म्हणजेच घरात आलेले बेबी यांच्याशी स्पर्धकांना केवळ मराठीतच बोलायचं आहे. या व्यतिरिक्त तुम्ही कोणतीही भाषा इथे वापरु शकत नाही असं असतानाच या टास्क दरम्यान झालेल्या एका गोंधळाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आणि या गोंधळाची सर्वत्र चर्चा उडाली. जेव्हा बाळ टीम बीच्या अंकिता वालावलकरकडे असतं तेव्हा अंकिता बाळाशी मालवणी भाषेत बोलते.

अंकिता ही मूळची कोकणातील आहे आणि मालवणी भाषा हा तिचा पॅटर्न आहे. सोशल मीडियावरही रील व्हिडीओ पोस्ट करत असताना ती मालवणी भाषेतच तयार करुन पोस्ट करते. त्यामुळे कोकणकन्या अशा अंकिता वालावलकरची मालवणी ही खासियत आहेत आणि अंकिताने बाळा बरोबर केलेलं संभाषण हे मालवणी मध्ये असल्याचं टीम ए ला खटकतं. त्यावरुन टीम ए बराच वाद घालताना दिसत आहे. वैभव बाहेर येऊन सदस्यांना अंकिताने मालवणी भाषा वापरली असल्याचे सांगतो. त्यावर निक्की, अरबाज पटेल मालवणी भाषा ही वापरु शकत नाही, असं कुठे लिहिलेलं नाही असेही म्हणताना दिसतात. तर वैभव ही मालवणी भाषा नॉन महाराष्ट्रीयन भाषा आहे असं म्हणताना दिसत आहे. यावरुन निक्की-अरबाज वैभव यांना बरंच ट्रोल करण्यात येत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : घनःश्यामला सेफ करत वैभवने अभिजीतला केलं नॉमिनेट, जान्हवी व निक्की भडकल्या, म्हणाल्या, “चुकीचा निर्णय आणि…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

तर अंकिता इथं सांगत असते की, मालवणी भाषा मराठीची उपभाषा आहे, त्यामुळे ही भाषा मी वापरू शकते की नाही इतकंच मी विचारलं होतं. मी ही भाषा वापरली नाहीये यावरही ते काहीच ऐकून घेत नाहीत आणि हुज्जत घालू लागतात. आता प्रेक्षक मंडळींनी हा प्रोमो पाहून निक्की अरबाज वैभव यांची चांगलीच कान उघडणीकेलेली पाहायला मिळत आहे. या प्रोमोखाली कमेंट करत मालवणी भाषेच्या होणाऱ्या अपमानाबाबत प्रेक्षक मंडळी भडकलेली दिसत आहेत. तर अभिनेत्री साक्षी गांधी हिने देखील कमेंट करत, “हे तर मला आवडलंच नाही. मालवणी नाही बोलायचं म्हणे, का नाही बोलायचं?, अंकिताने खरं तर यावर भाष्य करायला हवं होतं. पण त्या लोकांचं वर्चस्वच इतकंच आहे त्यामुळे ती गप्प बसली. हे कुठवर चालणार”, असं तिने म्हटलं आहे. “अहिरणी, मालवणी, विदर्भाची भाषा ही मराठीची उपभाषा आहे त्यामुळे त्या दुसऱ्या ग्रुपने यांचे पॉइंट्स कट केले आहे तर ते चुकीचे आहे”, “मालवणी भाषा नॉन महाराष्ट्रीयन केव्हापासून झाली. अंकिता जेव्हा विचारत होती तेव्हा ‘बिग बॉस’ने यावर उत्तर देणे आवश्यक होते”, असं म्हणत नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

आणखी वाचा – “बाई व बुगुबूगुच्या कानाखाली द्यायची आहे”, शोमध्ये येण्यासाठी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची Bigg Boss कडे विनंती, निक्की व जान्हवीला सरळ करायचं आहे कारण…

तर काहींनी, “मुळात मालवणी भाषा मूळची कोकणातील आहे आणि कोंकण महाराष्ट्रमध्ये येतो तर ते नॉन महाराष्ट्रीयन कसे काय”, “कालच्या भागात सांगितलं, मालवणी भाषा मराठी भाषा नाही, आणि त्याचे पॉइंट लिहिले गेले, हे कितपत योग्य आहे. वैभव तरी कुठे चांगला मराठी बोलतो, तो पण त्याच्या गावच्या भाषेत बोलतो. हे खूप चुकीचं आहे”, “यांना कोल्हापुरी चालते ती मराठी भाषा मानली जाते मालवणी नाही चालत”, “मालवणी ही मराठी भाषा नाही तर कोणती भाषा आहे”, असं म्हणत ट्रोल केलं आहे.

Tags: bigg boss marathibigg boss marathi 5colors marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Virat Kohli Fitness
Lifestyle

वाढतं वजन, धावायलाही अवघड, स्वतःचीच लाज वाटू लागली अन्…; विराट कोहलीने असं कमी केलं वजन

मे 15, 2025 | 7:00 pm
navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Next Post
Actress Titeeksha Tawde shared video of her sister Khushboo second baby shower on social media.

Video : मिठाई, विविध पदार्थ, समोसा-वडापाव अन्…; खुशबू तावडेचं असं झालं डोहाळे जेवण, बहीण तितीक्षाने पुरवले लाड

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.