Prajakta Dighe Comment On Shashank’s Post: मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेते शशांक केतकरने काही दिवसांपूर्वी निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकबाकीचा गंभीर आरोप करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये शशांकने मंदार देवस्थळी यांच्याकडून पाच वर्षे उलटूनही मानधन मिळालं नसल्याचा आरोप केला. त्यांच्याकडून सतत पुढच्या तारखा देण्यात आल्या आणि पैसे देण्याच्या थापा मारण्यात आल्याचंही नमूद केलं. काही वर्षांपूर्वी शशांक केतकरने ‘हे मन बावरे’ मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारे होती. मालिका प्रचंड लोकप्रिय झाली मात्र कलाकारांना त्यांचा मोबदला मिळाला नाही. बऱ्याच कलाकारांचे लाखो रुपये येणे अजूनही बाकी आहेत. तर शशांक केतकरचे पाच लाख रुपये अजून मिळायचे असल्याने त्याने सोशल मीडियावर मंदार देवस्थळी यांच्यावर आरोप केले. दरम्यान प्रकरणावर या सर्वांवर अनेक कलाकारांनी सुद्धा त्यांचे मतं व्यक्त केली.
‘ठरलं तर मग’ या मालिकेमधील कल्पनाची भूमिका साकारणारी म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता दिघेने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने म्हटलं की, “शशांक तू एकदम बरोबर केलं आहेस. आपल्या इंडस्ट्रीमध्ये नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी माणसं बरीच आहेत. माझे सुद्धा एका मराठी अभिनेत्रीने जिचं सोज्वळ ताई म्हणून नाव खूप मोठं आहे. लोकांचे पैसे द्यायचे आहेत म्हणून 2-3 महिन्यात परत देईन असे सांगून पाच लाख रुपये घेतले आहेत. आज चार वर्षे झाली तरीही पैसे परत करत नाही. गोष्टी मात्र करोडोमध्ये करते पण फक्त बाता, मैत्रीण आहे म्हणून गरजेसाठी दिले होते मात्र आता माझा मैत्रीवरचा ही विश्वास उडाला आहे.” असं म्हणत तिने अभिनेत्री प्राजक्ता दिघेने देखील संताप व्यक्त केला आहे. (Prajakta Dighe Comment On Shashank’s Post)
‘हे मन बावरे’, ‘पाहिले न मी तुला’, ‘मुरांबा’ यांसारख्या मालिकांमधून शशांक घराघरांत पोहोचला. शशांक सोशल मीडियावर प्रंचड लोकप्रिय असून त्याचं करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातले अपडेट्स चाहत्यांना देत असतो. शशांक केतकरने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट करुन एका मालिकेच्या निर्मात्याकडून मानधन थकवण्याचा आरोप केलेला. तसेच,त्याने ही पोस्ट करुन निर्मात्याला इशाराही दिलेला. पण, पोस्टमध्ये शशांकने कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. आता त्याने त्याच्या सोशल मीडियावरुन पोस्ट करुन निर्मात्याचं नाव घेऊन अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच, निर्मात्यासोबत झालेल्या संभाषणाचे काही स्क्रिनशॉर्ट्सही शेअर केले आहेत. (Prajakta Dighe Comment On Shashank’s Post)



