Daisy Shah Angry On Election Campaign: सध्या सगळीकडे निवणुकीची लगबग सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या पक्षाचं जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहे. असं असताना अनेकदा कार्यकर्त्यांना बऱ्याच गोष्टीच भान र्ऱ्हाट नाही. असा काहीसा प्रकार मुंबईतील वांद्रे पूर्व या भागात घडला आहे. या प्रकरणी बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने संताप केला आहे. अभिनेत्री डेझी शाहने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यासंदर्भात आवाज उठवला आहे.
सलमान खानसोबत काम केलेली अभिनेत्री डेझी शाहने सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये तिने तिच्या घराशेजारील इमारतीला आग लागल्याचं दाखवलं आहे. लोक प्रचार करत असल्याने आग लागली कारण ते फटाके फोडत होते असे तिने म्हटले आहे. या व्हिडिओत डेजी शाह तिच्या इमारतीच्या खाली उभी आहे. जिथे वरच्या मजल्यावरील एका घराला आग लागली आहे. हा व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “याठिकाणी काही लोक आले होते. निवडणुकीचा प्रचार करत होते. रस्त्यात फटाके फोडत होते. त्यामुळे इमारतीतील एका घराला आग लागली आहे. हे मूर्ख लोक रस्त्यात फटके फोडतात. मात्र यामुळे कुठे आग लागेल हे त्यांना समजत नाही. ही माणसे प्रत्येक इमारतीत जाऊन प्रचार करत होते. मात्र आग लागल्यानंतर ते पळून गेले. ज्या घराला आग लागली त्याच्यात बाजूला माझं घर आहे असं तिने सांगितले.” (Daisy Shah Angry On Election Campaign)
तर हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहलं, “माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी काहीही संबंध नाही. पण जेव्हा तुम्ही तुमच्या निवडणुकीसाठी प्रचार करण्यासाठी संघ नियुक्त करता तेव्हा कृपया त्यांच्यात थोडीशी सामान्य ज्ञान असल्याची खात्री करा. आमच्या बांधकाम समितीने त्यांना घरोघरी जाण्यास नकार दिला याबद्दल आभार. इमारतींजवळ फटाके फोडणे हे अतिशय चुकीचं आहे. जेव्हा लोकांमध्ये नागरीक जाणीव नसते तेव्हा असे घडते. ही नैसर्गिक आपत्ती नाही तर ती बुद्धीहीन लोकांमुळे येते. जबाबदारी घ्या,हीच वेळ आहे.” असं लिहीत तिने संताप व्यक्त केला आहे. (Daisy Shah Angry On Election Campaign)



