शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : नीता अंबानींचा लेकीसह स्टेजवर जबरदस्त डान्स, कुटुबियांसह उपस्थितही बघतच बसले अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 6, 2024 | 12:31 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Anant Ambani and Radhika Merchant Pre Wedding Celebration Updates in Marathi

Video : नीता अंबानींचा लेकीसह स्टेजवर जबरदस्त डान्स, कुटुबियांसह उपस्थितही बघतच बसले अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding in Jamnagar : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीचे कार्यक्रम गुजरात येथे पार पडले. या कार्यक्रमासाठी जगभरातून अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. हॉलिवूड,बॉलिवूड तसेच इतर क्षेत्रातील नामी व्यक्ती या लग्नासाठी उपस्थित होत्या. या कार्यक्रमामध्ये आलेल्या अनेक कलाकारांनी परफॉर्मन्स सादर केले. हॉलिवूड पॉपस्टार रिहानाच्या परफॉर्मन्स पासून खुद्द मुकेश अंबानी व नीता अंबानी यांच्या अभिनयाची चर्चा सर्वत्र झाली.

अनंत व राधिकाच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमाची रविवारी सांगता झाली. तीन दिवसीय ही कार्यक्रम थीमवर आधारित होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी नीता अंबानी व ईशा अंबानी यांनी एकत्रित एक परफॉर्मन्स दिला. हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मोठा मंच दिसून येत आहे. तसेच नीता अंबानी व ईशा यांनी सोनेरी चंदेरी रंगाच्या साडीमध्ये दिसून आल्या. दोघींनीही ‘कलंक’ चित्रपटातील ‘घर मोहे परदेसिया’ या गाण्यावर बहारदार नृत्य सादर केले. त्यांच्या नृत्याने उपस्थितांची मनेही जिंकली तसेच त्यांचे कौतुकही केले.

आणखी वाचा – “ट्रेनमधून उडी मारली आणि…”, लोकलने प्रवास करताना अंकिता लोखंडेचा झाला होता अपघात, अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “मैत्रिणीने मला…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

ईशा व नीता अंबानी यांच्यासह या कार्यक्रमामध्ये मुकेश अंबानी यांनी नीता अंबानी यांच्याबरोबर रोमॅंटिक डान्सही केला.तसेच त्यांनी एक व्हिडीओ बनवून त्यामध्ये वर्षभरातील गोड आठवणी,नातवंडावर आणारे प्रेम आणि कुटुंबामध्ये नवीन सदस्याचे म्हणजे होणाऱ्या सूनेचे स्वागत करण्यास उत्सुक असल्याचे बोलले आहे. तसेच तिसऱ्या दिवशी राधिकाच्या एंट्रीचा व्हिडीओदेखील प्रचंड व्हायरल झाला होता. यामध्ये तिने बेज रंगाचा लेहंगा परिधान केला होता. अनंत मंचावर असताना ती खूप खुश दिसत होती. तसेच मंचावर येताना अनंत तिच्याकडे एकटक पाहत असलेला देखील दिसला आणि मंचावर येण्यासाठी राधिकाला हातही दिला. या कृतीने सर्वांनीच या जोडीचे कौतुक केले.

आणखी वाचा – कॉमेडियन कृष्णा अभिषेकने स्वतःहून सांगितले त्याचे मानधन, गोविंदाचा भाचा असल्याचाही झाला फायदा, म्हणाला, “केवळ पैशासाठी…”

या कार्यक्रमामध्ये अभिनेता शाहरुख खान, सलमान खान,आमिर खान, दिलजित दोसांज,रणवीर सिंह,दीपिका पदुकोन,जान्हवी कपूर, सारा अली खान यांनी परफॉर्मन्स सादर केले. तसेच सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी,सैफ अली खान,करीना कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ यांनी हजेरी लावली होती.

Tags: Anant Ambani Wedding News in MarathiAnant Ambani-Radhika Merchant MarriageAnant Ambani-Radhika Merchant Pre Wedding FunctionsAnant Ambani-Radhika Merchant Wedding Date in MarathiAnant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding bashAnant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding JamnagarAnant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding Marathi NewsJamnagar Airportradhika merchantRihannaRihanna in Anant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Shreya Bugde Post

चला हवा येऊ द्या'ची १० वर्ष; सेलिब्रेशनच्या विशेष कार्यक्रमामध्येही निलेश साबळेला स्थान नाही, प्रेक्षक म्हणाले, "त्यांच्यामुळेच हा शो…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.