बरेच असे कार्यक्रम आहेत जे प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीतच घर करतात. अशातच एक कार्यक्रम आहे जो गेली १० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. गेल्या दहा वर्षांपासून या कार्यक्रमाने कोणताही खंड पडू न देता केवळ प्रेक्षकांच्या प्रेमापोटी त्यांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. हा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष सुरु असून या कार्यक्रमाचे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. (Shreya Bugde Post)
या कार्यक्रमाने त्याच्या विनोदी अंगाने प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवलं. याशिवाय या कार्यक्रमातील कलाकारही नेहमीच चर्चेत राहिले. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचा मोठा चाहतावर्ग आहे. पण काही दिवसांपासून टीआरपीच्या कारणाने हा कार्यक्रम बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. या कार्यक्रमातून डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, स्नेहल शिदम, अंकुर वाढवे, योगेश शिरसाट, रोहित चव्हाण, तुषार देओल ही कलाकार मंडळी घराघरांत पोहोचली. दरम्यान, या कार्यक्रमातून सूत्रसंचालनाची जबाबदरी सांभाळणाऱ्या निलेश साबळेने या कार्यक्रमातून काढता पाय घेतला.
अशातच नुकतीच चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. दशकपूर्ती होताच अभिनेत्री श्रेया बुगडेने केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. श्रेयाने चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील टीमचा फोटो शेअर केला आहे. यां फोटोसह तिने “दशकपूर्ती. १० वर्ष आणि अजूनही प्रवास सुरुच. मायबाप प्रेक्षक ऋणी आहोत. लोभ आहेच. तो वृद्धिंगत होवो”, असं कॅप्शन देत हा फोटो पोस्ट केला आहे. दरम्यान या फोटोत निलेश साबळे दिसत नसल्याने हा फोटो चर्चेत आला आहे.
श्रेयाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये निलेश साबळे दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच निलेश साबळेने या कार्यक्रमातून एक्झिट घेतली. श्रेयाने शेअर केलेल्या या फोटो निलेश साबळे न दिसल्याने अनेकांनी या पोस्टवर कमेंटचा भडीमार केला आहे. निलेश साबळे या फोटोत असायला हवा होता अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत, “डॉ. निलेश यांना या फोटोमध्ये मिस करतो आहे”, असं म्हटलं आहे. तर आणखी एका युजरने, “निलेश साबळेंना मिस करतोय. त्यांचं नाव घ्यायला हवं होत त्यांच्यामुळे हा शो सुरु झाला आणि त्यांनीच १० वर्ष चालवला”, अशी कमेंट केली आहे. एका चाहत्याने लिहिलं, “निलेश आणि सागर का नाहीत? त्यांना एका भागासाठीही तुम्हाला बोलावता आलं नाही? हे किती वाईट आहे”.