Rani Mukerji On Her Miscarriage : बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी हिने गेली तीन दशके बॉलीवूड इंडस्ट्रीत तिचं वर्चस्व गाजवलं. आजही तिचा चाहतावर्ग मोठा आहे. राणी मुखर्जीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. दरम्यान सध्या अभिनेत्री तिच्या ‘मर्दानी ३’ या चित्रपटामुळे विशेष चर्चेत आहे. या चित्रपटातून राणी मुखर्जीचा फिअरलेस अवतार पाहायला मिळत आहे. दरम्यान राणी मुखर्जी अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणं टाळते. फार कमी ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल व्यक्त होताना दिसते. दरम्यान नुकतेच तिने तिच्या आयुष्यातील कठीण काळातील एक प्रसंग सांगितला.
नुकताच अभिनेत्रीने पिंकव्हिलाशी संवाद साधताना तिने तिच्या आयुष्यातील एक दुःखद प्रसंग सांगितला. यावेळी तिने तिच्या गर्भपाताबद्दल खुलासा केला. आणि हा काळ तिच्यासाठी खूप कठीण असल्याचं तिने यावेळी सांगितलं. तिने सांगितलं की, “२०२० मध्ये ती दुसऱ्यांदा आई होणार होती पण माझा गर्भपात झाला. तेव्हा मी माझं बाळ गमावलं. मला त्यावेळी ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. आणि या चित्रपटामुळेच मला या दुःखातून बाहेर पडण्यास मदत झाली. २०२० मध्ये, राणीने तिचं दुसरं मूल गमावलं आणि हा धक्का तिला दूर करणं अशक्य वाटत होतं. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं तिला केवळ राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला नाही, तर त्या नाजूक आणि वाईट काळात तिला भावनिक त्राससातूनही बाहेर काढलं. (Rani Mukerji On Her Miscarriage)
राणी पुढे म्हणाली की, ‘मला ही कहाणी संपूर्ण भारताला सांगायची होती. परदेशात जाऊन तिथं स्थायिक होण्याचं आपलं वेड नेहमीच आनंदी नसतं हे समजून घेणं महत्त्वाचे आहे. आईला तिच्या डोळ्यांसमोरून मुल हिसकावून घेतल्यावर काय अनुभव येतो हे मला पडद्यावर दाखवायचं होतं. आईला होणारं दुःख आणि त्या निष्पाप मुलांवर होणारा परिणाम सांगणं खूप महत्वाचं होतं.’ (Rani Mukerji On Her Miscarriage)
आणखी वाचा: पीटी उषा यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, पतीचे निधन, घरातच चक्कर येऊन कोसळले आणि…




