काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा क्रिकेट स्टार शोएब मलिकने प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदबरोबर लग्न केले आहे. सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो व्हायरल होताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. गेल्या काही दिवसांपासून सानिया मिर्झा व तिचा पती शोएब मलिक यांच्यात घटस्फोट झाल्याच्या अनेक अफवा पसरल्या होत्या. पण शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाच्या अफवांना पूर्णविराम मिळाला.
अशातच काही दिवसांपूर्वी सानियाच्या वडिलांनी सानियाने शोएबला खुला घटस्फोट दिला असल्याचे म्हटले होते. तसेच सानिया शोएबच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळली असल्याचा खुलासाही शोएबच्या बहिणीने केला होता. त्यामुळे आता घटस्फोटानंतर शोएब सानियाला किती पोटगी देणार हा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण होऊ लागला.
सानिया मिर्झाच्या आधी शोएब मलिकने आयेशाशी लग्न केले होते. पण काही काळानंतर दोघांचा घटस्फोट झाला आणि घटस्फोटानंतर शोएबने तिला १५० मिलियन रुपये पोटगी म्हणून दिले होते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार शोएब मलिक २३० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. त्यामुळे सानियाला पोटगी म्हणून मिळणारी रक्कम ही त्याच्या पहिल्या पत्नीला दिलेल्या रक्कमेपेक्षा अधिक असणार असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, सानिया मिर्झा व शोएब मलिक हे गेल्या काही महिन्यांपासून एकत्र दिसत नव्हते. त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल अनेकदा अफवा पसरल्या होत्या. शोएब व सानियाला पाच वर्षांचा मुलगाही आहे जो सध्या सानियाबरोबर राहत आहे.