शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बाळाच्या मानेला…”, देबिना-गुरमीतने मुलाला उलटं लटकवताच नेटकऱ्यानी सुनावलं, व्हिडीओ पाहून म्हणाले, “खेळणं नाही तुम्ही…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 9, 2024 | 4:41 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Actress debina bonnerjee and gurmeet choudhary trolled for turning little-daughter upside down

"बाळाच्या मानेला...", देबिना-गुरमीतने मुलाला उलटं लटकवताच नेटकऱ्यानी सुनावलं, व्हिडीओ पाहून म्हणाले, "खेळणं नाही तुम्ही..."

‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध जोडी म्हणजेच अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि अभिनेता गुरमीत चौधरी. देबिना व गुरमीत हे दोघे सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या काही कलाकारांपैकी आहेत. सोशल मीडियावर ते त्यांचे काही फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात आणि त्यांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना आवडतेदेखील. पण त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.

देबिनाने नुकताच सोशल मीडियावर तिच्या मुलीबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. याच व्हिडीओवरून देबिना व गुरमीतला जोरदार ट्रोल केलं जात आहे. या व्हिडीओमध्ये देबिना व गुरमीत अवघ्या दीड वर्षांच्या मुलीला एका झटक्यात गोल फिरवतात आणि यामुळे या दोघांवर टीका केली जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Debinna Bonnerjee (@debinabon)

आणखी वाचा – १९ वर्षांचा संसार मोडला, एक मुलगी अन्…; घटस्फोटानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने निवडला अध्यात्मचा मार्ग, आश्रमातील व्हिडीओ केला शेअर

या व्हिडीओमध्ये देबिना व गुरमीत हे बेडवर बाळाबरोबर खेळत असतात. दोघं एकमेकांचा हात पकडून मध्ये त्यांच्या मुलीला उभं करतात. तिला मध्ये उभं केल्यानंतर देबिना व गुरमीत त्यांच्या हाताने तिला पूर्ण गोल फिरवतात. असं केल्यानंतर ते बाळ हसू लागते आणि तिच्याबरोबरच देबिना-गुरमीतसुद्धा हसू लागतात. मात्र ही मस्करी नेटकऱ्यांना काही आवडलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी दोघांनाही यावरून चांगलंच सुनावलं आहे.

आणखी वाचा – अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर खळबळ, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “अजून किती…”

यावर अनेकांनी बाळाबद्दल काळजी व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “लहान मुलांचं शरीर जरी लवचित असलं तरी अशाने बाळाच्या मानेला झटका बसू शकतो, कृपया असं करू नका, यामुळे बाळाच्या मानेला वेदना होतील, ते तुमचं बाळ आहे, खेळणं नाही, हे खूपच भयानक आहे, कृपया असं करू नका” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी त्या दोघांना चांगलेच सुनावले आहे. त्याचबरोबर सल्लादेखील दिला आहे.

Tags: bollywood actorbollywood actressBollywood entertainment newsbollywood newsdebina bonnerjeeentertainment newsgurmeet choudharyगुरमीत चौधरीडेबिना बॅनर्जीबॉलिवूड अभिनेताबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Dharmendra New Name

धर्मेंद्र यांनी बदललं स्वतःचं नाव, काय आहे त्यांच्या नव्या नावाचा अर्थ?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.